पतसंस्थेच्या आश्र्वासक घोडदौडीमुळे पुरस्काराचे मानकरी
प्रभाकर आरेकर, चेअरमन, श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था
गुहागर, ता. 05 : श्री समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेचे चेअरमन प्रभाकर आरेकर यांना सकाळ माध्यम समुहाने आयडॉल ऑफ महाराष्ट्र (चेअरमन) हा पुरस्कार देवून गौरविले. सहकार क्षेत्रातील तज्ञ म्हणून देशात परिचित असलेले विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते प्रभाकर आरेकर यांचा गौरव करण्यात आला. कोल्हापूरमध्ये झालेल्या या सोहळ्याला सकाळचे संचालक संपादक श्रीराम पवार, निवासी संपादक निखिल पंडीतराव आणि सरव्यवस्थापक रवींद्र रायकर उपस्थित होते. Idol of Maharashtra Award to Arekar

स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि दै. सकाळला 90 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात लाखमोलाची कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना आयडॉल ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने गौरविणाचा उपक्रम सकाळ माध्यम समुहाने सुरु केला आहे. प्रत्येक आवृत्तीमध्ये स्वतंत्र निवड प्रक्रिया राबवून पुरस्कारार्थींची नावे निश्चित केली जातात. प्रत्येक क्षेत्रातील पुरस्कारांच्या वितरणासाठी त्या क्षेत्रातील मान्यवरांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रीत केले जाते. यापूर्वी गुहागर तालुक्यातील सौ. नेत्रा ठाकूर, मोहन संसारे, खातू मसाले उद्योग यांचा गौरव सकाळ माध्यम समुहाने केला. Idol of Maharashtra Award to Arekar
त्यानंतर सहकारातील विविध संस्थांचे चेअरमन म्हणून यशस्वी झालेल्या व्यक्तिंचा गौरव करण्यात आला. यामध्ये गुहागर तालुक्यातील चिखलीचे सुपुत्र आणि मुळ गाव गुहागर असलेले प्रभाकर आरेकर यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली. Idol of Maharashtra Award to Arekar
विद्याधर अनास्कर यांचा परिचय
लिज्जत पापड या सहकारी गृहउद्योगाशी निगडीत असलेले विद्याधर अनास्कर महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष आहेत. आहेकेच्या नागरी सहकारी बँकांच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. महाराष्ट्र अर्बन बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष. नॅशनल फेडरेशनचे उपाध्यक्ष, सहकार कायदा दुरुस्तीसंदर्भात विविध राज्यांच्या समित्यांचे सदस्य असेही काम त्यांनी केले आहे. Idol of Maharashtra Award to Arekar

प्रभाकर आरेकर यांचा सहकार क्षेत्रातील प्रवास
गुहागर तालुक्यातील चिखली हे मुळ गांव असणाऱ्या प्रभाकर आरेकर यांनी बी. कॉम. पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर 1971 मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकरीला सुरवात केली. 35 वर्ष इतक्या प्रदिर्घ कालावधीत प्रभाकर आरेकर यांनी नोकरीबरोबरच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी पतसंस्थेचे आठ वर्ष संचालक म्हणून काम केले. तर किसान स्टाफ सोसायटीचे ते अध्यक्ष होते. गुहागर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. या निमित्ताने त्यांना सहकार क्षेत्रातील अनेक चांगल्या वाईट घटना जवळून अनुभवता आल्या. नोकरीच्या कालखंडातच सहकार क्षेत्रातील डिप्लोमा (जीडीसी ॲण्ड ए) त्यांनी पूर्ण केला. Idol of Maharashtra Award to Arekar
नोकरीत असतानाच सहकार क्षेत्राला बळ मिळेल असे काहीतरी वेगळं करुन दाखवावं असे विचार त्यांना स्वस्थ बसु देत नव्हते. ही इच्छा त्यांनी त्यांच्यासोबत जिल्हा बँकेत काम करणाऱ्या मित्रांना बोलून दाखवली. त्यातूनच 2002 मध्ये पतसंस्थेचा जन्म झाला. 13 जून 2002 रोजी चिपळूणमध्ये श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. केवळ 200 चौ. फुटाच्या भेंडी नाका येथील मुख्य कार्यालयातून संस्थेच्या कामकाजाला सुरवात केली. Idol of Maharashtra Award to Arekar

निवृत्तीनंतर आपल्या सहकार्यांना सोबत घेवून प्रभाकर आरेकर यांनी व्यवसायवृध्दीसाठी समाजातील मान्यवरांच्या भेटी गाठी घेणे, गट बैठकांमधुन सभासद संख्या वाढविणे अशी अनेक कामे सुरु केली. इथे जिल्हा बँकेत नोकरी करताना तयार झालेली स्वच्छ प्रतिमा उपयोगी पडली. अल्पावधीत त्यांच्या मेहनतीला यश आले. अवघ्या अडीच वर्षात समर्थ भंडारी नागरी पतसंस्थेने चिपळूण शहराबाहेर उमरोली येथे आपली पहीली शाखा क्रियन्वित केली. संस्थेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांमध्ये ठेवीच्या सुरक्षिततेबाबत विश्र्वास निर्माण केल्याने ठेवींमध्ये सातत्याने वाढु लागली. पारदर्शक व्यवहार आणि व्यावसायिकता जपत श्री समर्थ भंडारी प्रगती करु लागली. Idol of Maharashtra Award to Arekar
चिपळूण तालुका मर्यादित कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेने सहकार खात्याकडे संपूर्ण कोकण कार्यक्षेत्राचा प्रस्ताव ठेवला. हा प्रस्ताव तत्काळ मान्य झाला. लगेचच पतसंस्थेने कार्यविस्ताराचे धोरण आखले. चिपळूण उमरोली पाठोपाठ खेर्डीत शाखा सुरु केली. चिपळूण तालुका ओलांडत गुहागर, शृंगारतळी अशा शाखा 2007 मध्ये सुरु झाल्या. 2016 मध्ये शिरगांव, सावर्डे, 2017 मध्ये देवरुख, दापोली, दाभोळ, 2019 मध्ये संगमेश्र्वर व माखजन, 2020 मध्ये रत्नागिरी व हर्णै आणि 2022 मध्ये आबलोली. अशा 15 शाखा व पाग, मिरजोळी आणि रत्नागिरी येथील 3 कलेक्शन सेंटरद्वारे पतसंस्थेचे कामकाज सुरु झाले. या सर्व शाखांमध्ये वीज बील भरणा, एटीएम, मनी ट्रान्सफर यासारख्या सेवाही दिल्या जातात. लवकरच नवी मुंबईतील नेरुळ, खेड आणि मंडणगड येथे नवीन शाखा सुरु होणार आहे. गेल्या ५ वर्षात या पतसंस्थेने अ ऑडिट वर्ग मिळवला आहे. 14 टक्के लाभांश देणारी पतसंस्था असा नावलौकिक कमावला आहे. Idol of Maharashtra Award to Arekar

आर्थिक क्षेत्रात काम करणारी श्री समर्थ भंडारी पतसंस्था सामाजिक कार्यातही सहभागी होते. दरवर्षी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार वार्षिक सर्वसाधारण सभेत केला जातो. कोरोना काळात कामथे येथील उप जिल्हा रुग्णालयाला विविध सोयी सुविधांसाठी पतसंस्थेने आर्थिक मदत केली. 2021च्या चिपळूणच्या महापुरात तत्परतेने आवश्यक मदत पतसंस्थेने केलीच शिवाय छोट्या व्यावसायिकांना उभारी देण्यासाठी लवचिक धोरण ठरवून कर्ज पुरवठा केला. Idol of Maharashtra Award to Arekar
दृष्टीक्षेपात समर्थ भंडारी पतसंस्था (मार्च 2022 अखेर)
एकूण शाखा : 15
एकूण सभासद : 5821
वसुल भागभांडवल : 7 कोटी 11 लाख 76 हजार
एकूण ठेवी : 126 कोटी 39 लाख .63 हजार
एकूण कर्ज वाटप : 102 कोटी 90 लाख 53 हजार
नफा : 3 कोटी 35 लाख 27 हजार
लाभांश टक्केवारी : 14 टक्के 1971 च्या काळात राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी सहजशक्य होती. मात्र सहकार क्षेत्राचे आकर्षण असल्याने अल्प पगार असूनही जिल्हा बँकेत नोकरी स्विकारली. राष्ट्रीय बँक सदाशेठ आरेकर, महादेवराव शिर्के यांच्यासारख्या तळमळीने, अभ्यासू आणि चिकित्सक वृत्तीने काम करणाऱ्या अनेक व्यक्तींमुळे सहकाराची ताकद कळली. या नोकरीमुळे तळागाळातील माणसांपर्यंत पोचल्याने गरजही कळली. आमच्यावरील विश्र्वास, आमची कार्यशैली, आर्थिक शिस्त यातून पतसंस्था उभी राहीली आणि वेगाने प्रगतीची घोडदौड करत आहे. हे सहकाराचे आणि मध्यवर्ती बँकेतून मिळालेल्या अनुभवाच्या शिदोरीचे यश आहे. Idol of Maharashtra Award to Arekar
