• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
5 September 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरी जि. प. ‘आदर्श शिक्षक पुरस्कारा’साठी १० शिक्षकांची निवड

by Mayuresh Patnakar
September 4, 2026
in Ratnagiri
159 2
0
Ideal Teacher Award
313
SHARES
893
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 04 : जिल्हा परिषद रत्नागिरीच्या शिक्षण विभागामार्फत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी देण्यात येणार्‍या जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी १० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त, कोकण विभाग, मुंबई यांनी या निवडीला अंतिम मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. मनीषा जगदाळे यांनी दिली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे व मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या वतीने हे पुरस्कार आज ४ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आले आहेत. Ideal Teacher Award

तालुकानिहाय निवड झालेले आदर्श शिक्षक पुढीलप्रमाणे १. मंडणगड- निलेश तुळशीराम लोखंडे, (उपशिक्षक जि.प.मराठी शाळा तिडे आदिवासीवाडी) २. दापोली – दिनेश कानू चिपटे, (उपशिक्षक जि.प. आदर्श शाळा भरणे कोंडारण), ३. खेड – श्रीमती दिप्ती दिलीप यादव, (पदवीधर विषय शिक्षिका जि.प. शाळा माणी नंबर ०१) ४. चिपळूण – विनोद जानू हुंबरे, (पदवीधर शिक्षक जि.प.शाळा चिवेली वरची) ५. गुहागर – प्रभू रघुनाथ हबर्डे, (उपशिक्षक जिल्हा परिषद आदर्श शाळा वेलदुर घरटवाडी) ६. संगमेश्वर – राजेश अर्जुन सावंत, (पदवीधर शिक्षक जि.प.आदर्श शाळा पूर) ७. रत्नागिरी – श्रीमती रश्मी राजन वाडेकर, (उपशिक्षिका जि.प. शाळा शिवार आबेरे नंबर ०२), ८. लांजा – दिलीप शंकर चव्हाण, (पदवीधर शिक्षक जि.प.आदर्श पन्हळे नंबर ०१), ९. राजापूर – श्रीमती स्नेहा सुहास काडगे, (उपशिक्षिका जि.प. आदर्श शाळा पाथर्डे) Ideal Teacher Award

याशिवाय कला पुरस्कार (विशेष पुरस्कार) म्हणून संगमेश्वर तालुक्यातील संदेश प्रकाश झेपले, उपशिक्षक, जिल्हा परिषद शाळा साडवली सह्याद्रीनगर यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व शिक्षकांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल शिक्षण क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Ideal Teacher Award

Tags: GuhagarGuhagar NewsIdeal Teacher AwardLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share125SendTweet78
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.