ICG आणि गुजरात ATS ची संयुक्त कारवाई
नवी दिल्ली, ता. 28 : भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत पाकिस्तानी नौका ‘अल सोहेली’ पकडली. ICG intercepts Pak boat या नौकेतून शस्त्रे, दारुगोळा आणि 300 कोटी रुपयांचे 40 किलो मादक पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच नौकेवरील 10 कामगारांना अटक करुन ओखा बंदरात आणण्यात आले. ही कारवाई रविवार (25 डिसेंबर) ला मध्यरात्री करण्यात आली. गेल्या 18 महिन्यातील ही सातवी कारवाई आहे. ICG intercepts Pak boat
भारतीय सागर सीमेवर गेली दिड वर्ष संशयास्पद बोटी सापडणे, भारतीय मच्छीमार नौकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. गुजरात राज्यातील सागरी किनारपट्टीवर भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने गेल्या 18 महिन्यात सातव्यांदा कारवाई करत पाकिस्तानी नौका ताब्यात घेतली. ICG intercepts Pak boat


ICG intercepts Pak boat
रविवारी, 25 डिसेंबरला रात्री आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेवर भारतीय तटरक्षक दलाची वेगवान नौका अरिंजय (ICGS Arinjay) गस्त घालत होती. रात्री उशिरा एक नौका भारतीय सीमेच्या आत संशयास्पदरित्या फिरत असल्याचे तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांना समजले. अरिंजयवरील अधिकाऱ्यांनी सदर नौकेला थांबण्याचा इशारा दिला. संशयास्पद नौका तिथून पळून जाऊ लागल्यावर तटरक्षक दलाच्या जवानांनी चेतावणी देण्यासाठी गोळीबार केला. तटरक्षक दलाच्या आक्रमणामुळे नौकेतील खलाशांनी शरणागती पत्करली. त्यानंतर तटरक्षक दलाच्या सशस्त्र जवानांनी नौकवर ताबा मिळवला.


सदर मच्छीमार नौकेचे नाव ‘अल सोहेली’ असे आहे. तटरक्षक दलाच्या जवानांनी नौकेवर शोधमोहिम राबवली. तेव्हा शस्त्रे, दारुगोळा आणि 300 कोटी रुपयांचे सुमारे 40 किलो अमली पदार्थ सापडले. त्याचप्रमाणे अल सोहली नौकेवरील 10 पाकीस्तानी कामगारांनाही तटरक्षक दलाच्या जवानांनी ताब्यात घेतले. गुजरातमधील ओखा बंदरात मुद्देमालासह 10 पाकीस्तानी कामगारांना गुजरात दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात देण्यात आले. ICG intercepts Pak boat
गेल्या 18 महिन्यात गुजरात दहशतवाद विरोधी पथक व भारतीय तटरक्षक दलाने केलेल्या संयुक्त कारवायांमध्ये 1,930 कोटी रुपयांचे एकूण 346 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले असून 44 पाकिस्तानी आणि 7 इराणी कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले आहे. ICG intercepts Pak boat