उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली माहिती
गुहागर, ता. 22 : बारावीचा निकाल 31 मेपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. बारावी परीक्षेवेळीच शिक्षक आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे तब्बल 20 दिवस पेपर तपासणी रखडली होती. याचा फटका निकालाच्या कामाला बसला असून बारावी निकालाची निश्चित तारीख अद्याप ठरली नसल्याचेही गोसावी म्हणाले. HSC Result by 31 May
21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान बारावीची परीक्षा पार पडली. या परीक्षेला राज्यातील एकूण 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा सुरू होताचा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने विविध मागण्यांसाठी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला. या बहिष्कार आंदोलनात 20 दिवस पेपर तपासणी होऊ शकली नाही. त्यामुळे पेपर तपासणी पूर्ण होऊन निकाल तयार करण्यास वेळ लागत आहे. HSC Result by 31 May

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच जूनच्या पहिल्याच आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहितीही शरद गोसावी यांनी दिली. यंदा दहावीच्या परीक्षेला राज्यभरातून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. HSC Result by 31 May
दहावी-बारावी निकालाच्या तारखा निश्चित करण्यापूर्वी राज्य शिक्षण मंडळात सर्व विभागीय शिक्षण मंडळाची गोपनीय बैठक पार पडते. या बैठकीत विभागीय निकालाच्या कामाचा आढावा घेऊन त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्याची तारीख ठरविण्यात येते, मात्र अद्याप राज्य शिक्षण मंडळात अशी गोपनीय बैठकही पार पडलेली नाही. HSC Result by 31 May
