गुहागर, ता. 20 : आपण घरगुती गॅस सिलेंडर विकत घेताना त्यातून गॅस तर लीक होत नाहीये ना याची योग्य रीतीने तपासणी करतो. पण त्याचबरोबर टाकी किती जुनी आहे हे देखील तपासले पाहिजे. ती कशा प्रकारे चेक करायची ते पाहूयात…. How to check cylinder expiry date
सिलेंडरची एक्स्पायरी डेट कशी चेक करावी
कोणत्याही एलपीजी सिलेंडरच्या एका पट्टीवर एक कोड लिहिलेला असतो. हा कोड म्हणजेच सिलेंडरची एक्स्पायरी डेट. हा कोड A-23, B-24, C-25 आणि D-26 असा असतो. आता या कोडवरुन सिलेंडरची एक्स्पायरी कशी समजते ते समजून घेऊया.. How to check cylinder expiry date
ABCD या इंग्रजी अक्षरांना तीन-तीन महिन्यांच्या गटात विभागणी केली जाते.
A – जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च
B – एप्रिल, मे आणि जून
C – जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर
D – ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर
एकंदरीत, आता समजा, तुमच्या गॅस सिलेंडरवर B-23 लिहिलेलं असेल, तर तुमचा सिलेंडर एप्रिल ते जूनपर्यंत चालू शकतो. म्हणजेच जून महिन्यानंतर तुमचा सिलेंडर एक्स्पायर होईल. How to check cylinder expiry date
