राष्ट्रवादीने मांडली वेगळी चुल, नगराध्यक्ष पदासह 5 प्रभागात दिले उमेदवार
गुहागर, ता. 21 : How the BJP Shivsena alliance came
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे दिवशी म्हणजे शुक्रवार 21 नोव्हेंबरला सकाळी शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण युती करण्याचा संदेश घेऊन आले आणि गुहागर नगरपंचायत भाजप शिवसेना युती (BJP Shivsena alliance) म्हणून लढणार यावर शिक्कामोर्तब झाले. युतीमधील जागा वाटपात नगराध्यक्ष आणि 8 जागा भाजपने (BJP) लढवायच्या तर 9 जागा शिवसेनेने लढवायच्या यावरही शिक्कामोर्तब झाले. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादांच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष साहील आरेकर यांनी दोन पेक्षा अधिक जागा पाहीजेतच असा आग्रह धरला. ही मागणी मान्य न झाल्याने महायुती तुटली. राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह 5 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. How the BJP Shivsena alliance came
How the BJP Shivsena alliance came
गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्ष भाजपचाच ही भुमिका भाजपने सुरवातीपासून घेतली होती. मागील निवडणुकीत शहर विकास आघाडी स्थापन करुन नगराध्यक्ष बनलेले राजेश बेंडल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि विधानसभा लढवली. आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात चांगली लढतही दिली. त्यामुळे गुहागरचा नगराध्यक्ष शिवसेनेचाच असावा असा आग्रह शिवसेनेकडून धरला गेला. 2009 नंतर गुहागरमध्ये झालेल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कितीही आग्रह धरला तरी प्रदेश भाजपकडून तो मोडून काढला जातो हा इतिहास सर्वश्रुत आहे. त्यामुळे प्रदेश भाजपच्या माध्यमातून भाजपचा नगराध्यक्ष पदाचा हट्ट मोडून काढता येईल असा अंदाज शिवसेनेच्या गोटातून व्यक्त होत होता. मात्र गुहागर शहरातील भाजप कार्यकर्ते यावेळी आपल्या भुमिकेवर ठाम राहीले. केवळ भुमिकाच घेतली नाही तर उमेदवारी अर्ज भरताना पक्षाकडून एबी फॉर्म मिळाले तिथे भाजप म्हणून व अन्य ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारही उभे केले. शिवसेनेने मात्र युती होईल या भरवशावर राहुन भाजपच्या प्रभागांमध्ये सर्व ठिकाणी उमेदवार दिले नव्हते. भाजपच्या प्रदेश पातळीवर महायुतीचा आग्रह धरताना स्थानिक आमदारांना झुकते माफ दिले होते. या धोरणानुसार खेडमध्ये वैभव खेडकर भाजप आल्यानंतरही खेड नगर परिषदेत शिवसेनेने नगराध्यक्ष पदावरुन भाजपची बोलवण केवळ 3 नगरसेवक पदांवर केली. परिणामी दापोली, खेडमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिले. हेच लोण अन्यत्र पसरले तर पक्ष सावरणे कठीण जाईल हे लक्षात घेऊन प्रदेश भाजपने गुहागरमधील भाजप कार्यकर्त्यांची भुमिका मान्य केली आणि युती झाली नाही तर स्वबळावर लढण्यास हिरवा कंदिल दाखवला. या सगळ्या राजनैतिक घडामोडींचा परिणाम जिल्ह्यांतील निवडणुकांवर होऊ नये म्हणून शिवसेनेच्या वरिष्ठांनी गुहागरचा नगराध्यक्ष भाजपचाच हे मान्य केले. जागा वाटपाचे सुत्रावर आधीच चर्चा झाली होती. भाजपसह शिवसेनेच्या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरताना एकमेकांचे साह्य हवे होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सकाळी झालेली युती सर्वांनी सहज स्विकारली. लगेचच सुत्रे हलली. भाजपच्या एबी फॉर्मवर उमेदवारी दाखल केलेल्या 4 जणांनी आपली उमेदवारी मागे घेतली. तसेच शिवसेनेने देखील नगराध्यक्ष पदासह एका नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला. स्थानिक पातळीवर सहजपणे युतीचे स्वागत झाले. How the BJP Shivsena alliance came
आता गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपच्या सौ. निता विकास मालप या युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. प्रभागांमध्ये 2,4,5,6,8,9,12,14, या जागांवर भाजप निवडणूक लढवित आहे. तर 1,3,7,10,11,13,15,16,17 या जागांवर शिवसेनेचे उमेदवार रिंगणात आहेत.
NCP Quit form Mahayuti
महायुतीच्या जागावाटपामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) दोन जागा देण्याचे ठरले होते. अधिकच आग्रह झाला तर तिसरी जागा सोडण्याचा विचारही केला जाणार होता. मात्र राष्ट्रवादीचे तरुण तडफदार तालुकाध्यक्ष साहील आरेकर यांनी 5 जागांचा हट्ट काही सोडला नाही. महायुतीचा निर्णय रेंगाळत असलेला पाहून साहील आरेकर यांनी प्रभाग क्रमाकं 1, 12, 13, 14 व 17 या जागांवर पक्षाचे अधिकृत उमेदवार उभे केले होते. इतकेच नव्हेतर दोन वेळा नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षातून निवडून आलेल्या सौ. सुजाता बागकर यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार केले. आपली मागणी मान्य होत नाही म्हटल्यावर त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. साहील आरेकर यांनी स्वत:चा उमेदवारी अर्ज मागे घेतला. अन्य 5 जागांवरील उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात ठेवले. हे पाचही उमेदवार भाजप शिवसेना युती (BJP Shivsena alliance) लढत असलेल्या प्रभागांमध्ये आहेत. याचा राष्ट्रवादीला नेमका फायदा तोटा काय होणार हे निवडणुकीच्या निकालांनंतर समोर येईल. तरीही भाजप आणि शिवसेनेतील नेतेमंडळींसमोर साहील आरेकर यांनी दबावात येऊन तडजोड केली नाही. त्यांच्या या नेतृत्व गुणांचे, कणखर वृत्तीचे कौतुकही केले पाहीजे. How the BJP Shivsena alliance came
