• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पाटपन्हाळे महाविद्यालयात सन्मान व गुणगौरव कार्यक्रम संपन्न

by Ganesh Dhanawade
October 11, 2022
in Guhagar
21 0
0
Honors Program at Patpanhale College
41
SHARES
116
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तालुका मराठी भाषा मंडळातर्फे

गुहागर, ता. 11 : गुहागर तालुका मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे शिक्षक सन्मान व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे (English School and Junior College Patpanhale) येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उपस्थित मान्यवर, मराठी विषयाचे शिक्षक, गुणवंत विद्यार्थी व पालक यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ए.एस.जोशी यांनी सदर नियोजित कार्यक्रमाचा हेतू, मंडळातर्फे राबवले जाणारे उपक्रम व कार्यक्रम, विद्यार्थी व शिक्षकांसाठी राबविले जाणारे मार्गदर्शन कार्यक्रम व उपक्रम याबाबत प्रास्ताविकमधून माहिती दिली. Honors Program at Patpanhale College

गुहागर तालुका मराठी भाषा मंडळ गुहागरतर्फे मराठी भाषा अध्यापनाच्या योगदानाबद्दल तसेच सेवानिवृत्तनिमित्त देवघर हायस्कूलचे शिक्षक एम.बी. घस्ती, कोतळुक हायस्कूलचे शिक्षक व मराठी भाषा मंडळाचे माजी अध्यक्ष बी.के.शिरतोडे, मराठी भाषा मंडळाचे सल्लागार, गुहागर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व अंजनवेल हायस्कूलचे मुख्याध्यापक एम.डी गोरीवले यांनी राज्यस्तरीय मुख्याध्यापक पुरस्कार संपादन केल्याबद्दल, वाघांबे हायस्कूलचे शिक्षक व मंडळाचे विद्यमान अध्यक्ष ए.एस.जोशी यांनी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार संपादन केल्याबद्दल, तसेच मराठी भाषा विषयाचे तज्ञ मार्गदर्शक मुंढर हायस्कूलचे मुख्याध्यापक व मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष ए.एच.साठे, पाटपन्हाळे हायस्कूलच्या शिक्षिका व मंडळाच्या सल्लागार एस.एस.चव्हाण व पालपेणे हायस्कूलचे शिक्षक व जिल्हा प्रतिनिधी आर.जी.मोहिते यांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र, शाल व पुष्पगुच्छ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. Honors Program at Patpanhale College

गुहागर तालुका मराठी भाषा मंडळाचे सदस्यांच्या पाल्यांनी विविध परीक्षांमध्ये सुयश संपादन केल्याबद्दल विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दहावी परीक्षा उत्तीर्ण कु. श्वेत संदीप रामाणे, कु. हर्ष भूषण बागल, कु.सृष्टी शरद चांदिवडे. बारावी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी कु.दीक्षा केशव आग्रे, कु.निधी मंगेश गोरीवले, कु.साक्षी पोपट साळुंके, कु.स्नेहा राजेश मोहिते, कु.सौरभ भूषण बागल, कु. मृणालिनी बापू बांगर तसेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये उज्वल सुयश संपादन करून डॉक्टर पदवी संपादन केलेल्या ऋतुजा मधुकर गंगावणे – बी.ए.एम.एस यांना गौरवपत्र व गुलाबपुष्प मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले. Honors Program at Patpanhale College

Honors Program at Patpanhale College

शिक्षक सन्मान व गुणवंत गौरव कार्यक्रमासाठी आग्रे के.जी., साळुंके पी.व्ही, बागल बी., मोहिते आर.जी., बांगर बी., एस.बी.रामाणे आदी बहुसंख्य मराठी भाषा विषयाचे शिक्षक व पालक म्हणून सौ.गोरिवले उपस्थित होते. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर , शिक्षक , गुणवंत विद्यार्थी व पालक यांना गुहागर तालुका मराठी भाषा मंडळातर्फे अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.  Honors Program at Patpanhale College

या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळेचे मुख्याध्यापक एम.ए.थरकार, देवघर हायस्कूलचे मराठी भाषा विषयाचे सेवानिवृत्त शिक्षक एम. बी घस्ती, गुहागर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, मराठी भाषा मंडळाचे सल्लागार व अंजनवेल हायस्कूलचे मुख्याध्यापक एम.डी गोरीवले, मुंढर हायस्कूलचे मुख्याध्यापक व मराठी भाषा मंडळाचे उपाध्यक्ष ए.एच.साठे, पाटपन्हाळे हायस्कूलच्या शिक्षिका व मंडळाच्या सल्लागार एस.एस. चव्हाण उपस्थित होते. उपस्थित मान्यवर, मराठी भाषा शिक्षक, गुणवंत विद्यार्थी व पालक यांचे बहुसंख्य उपस्थितीने कार्यक्रम संपन्न होण्यासाठी सहकार्य लाभल्याबद्दल गुहागर तालुका मराठी भाषा मंडळाचे सहसचिव व पाटपन्हाळे हायस्कूलचे शिक्षक एस.एम.आंबेकर यांनी आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला. Honors Program at Patpanhale College

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHonors Program at Patpanhale CollegeLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.