• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मनसेच्या वर्धापन दिनी कर्तृत्ववान महिलांचा गौरव

by Ganesh Dhanawade
March 11, 2023
in Guhagar
229 2
0
Honoring women on MNS's anniversary
450
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.11 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापन दिनानिमित्त गुहागर तालुका मध्यवर्ती संपर्क कार्यालय शृंगारतळी येथे श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने  सांबसदाशिव सभागृह, (पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण) येथे कर्तृत्ववान महिलांचा गौरव व प्रत्येक समाजाचा उत्कर्ष हे मनसेचे उद्दिष्ट याच उद्दिष्ट पूर्तीचा भाग म्हणून गुहागर तालुक्यातील सर्व समाजातील तालुकाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. Honoring women on MNS’s anniversary

हा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने व तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व समस्त मनसैनिकांच्या सहकार्याने जागतिक महिला दिन तसेच मनसे वर्धापन दिन साजरा करण्यात आला.  या कार्यक्रमाला तहसीलदार प्रतिभा वराळे, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर, माजी पंचायत समिती सभापती सुचिता वेल्हाळ, सरपंच मयुरी शिगवण आदी उपस्थित होते. Honoring women on MNS’s anniversary

यावेळी बोलताना प्रमोद गांधी यांनी सांगितले की, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गुहागर तालुक्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव मनसेच्या वतीने करण्यात येत आहे. शारीरिक अपंगावर मात करून जिद्दीने या महिला समाजात काम करत आहेत. अशा महिलांचा मनसे नेहमीच आदर करीत आहे. त्यांच्या जिद्दीचा इतर महिलांनी आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी डॉ. योगिता खाडे (आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू ), श्रीमती माधवी अरुण जाधव (संरक्षण अधिकारी महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन), श्रीमती रसिका राजन दळी (उद्योजक महिला मातीची भांडे जिल्हास्तरीय पुरस्कार), श्रीमती पुनम राजेंद्र साळवी (वकील, संघटना खजिनदार), डॉ. रूपाली जानवळकर (दंतचिकित्सक), श्रीमती वैशाली प्रतीक रहाटे (पोलीस महिला), श्रीमती संगीता संदीप भाटकर( एचपी गॅस एजन्सी), श्रीमती अमृता अंकुश जानवळकर (आशा सेविका), श्रीमती मयुरी महेश शिगवण (सरपंच तळवली), श्रीमती समीक्षा स्वप्नील बारगोडे (सरपंच वेळब), श्रीमती विजया मैस्त्री (अंध महिला उद्योजक गॅस एजन्सी आणि दुकान) यांचा सन्मान करण्यात आला. तसेच गुहागर तालुक्यातील सर्व समाज तालुका अध्यक्ष यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच वकील सुशील अवेरे, पत्रकार गणेश किर्वे यांचा सत्कार करण्यात आला. Honoring women on MNS’s anniversary

या कार्यक्रमासाठी समीर जोयशी, वैभवी जानवळकर, साधना जोयशी, सागर शिरगावकर, सचिन जोयशी, राहुल जाधव, प्रसाद कुष्टे, सुनील मुकनाक, प्रमोद जोयशी, किरण आंबेकर, महेश घाणेकर, सचिन निकम व सर्व मनसे सैनिकांनी मेहनत घेतली. Honoring women on MNS’s anniversary


Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHonoring women on MNS's anniversaryLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share180SendTweet113
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.