शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी व गुहागर युवा सेना आयोजित
गुहागर, ता. 22 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी व युवा सेना गुहागर तर्फे शहरातील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम शिवसेनेच्या वर्धापन दिनी घेण्यात आला. Honoring the meritorious in Guhagar city

दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये गुहागर शहरातील इयत्ता दहावी मध्ये कु. आर्या समीर पावसकर ९५.८० टक्के, कु. कनिष्का समीर बावधनकर ९५.४० टक्के, कु. यश सुभाष शिर्के ९५.४० टक्के, तर इयत्ता बारावी मध्ये कु. सिद्धी संदीप मुकनाक ७४ टक्के (शास्त्र शाखा), कु. अनिषा संजय कानसरे ८२.६७ टक्के (वाणिज्य शाखा), कु. यश धोंडू म्हसकर ८३.१७ टक्के (कला शाखा) या यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. Honoring the meritorious in Guhagar city

यावेळी शिवसेना शहर प्रमुख सिद्धिविनायक जाधव, महिला आघाडी प्रमुख श्रीम. सारिका कनगुटकर युवासेना प्रमुख राज विखारे, उपशहर प्रमुख प्रवीण रहाटे, पराग मोरे, महिला आघाडी उपप्रमुख श्रीम. संगीता वराडकर, विभाग प्रमुख समीर कनगुटकर, युवासेना उपशहरप्रमुख सोहम सातार्डेकर, युवासेना विभाग प्रमुख किरण पावस्कर, उपविभाग प्रमुख शुभम तवसाळकर आदी उपस्थित होते. Honoring the meritorious in Guhagar city
