अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे
रत्नागिरी, ता. 19 : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला. इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचा सत्कार मंडळाच्या ल. वि. केळकर वसतिगृहाच्या भगवान परशुराम सभागृहात संपन्न झाला. Honoring the meritorious


प्रमुख पाहुणे फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर लेले यांनी विद्यार्थ्यांना तीन बोधकथा सांगून पैसे, श्रम, कष्टाचे महत्त्व पटवून दिले. कोरोनापूर्वी मोबाईलचा वापर नको, असे चित्र होते, पण कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना मोबाईलवरच ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले. पाचवी, आठवी शिष्यवृत्ती हे महत्त्वाचे टप्पे आहेत. आयुष्यात कष्ट, मेहनतीला भरपूर किंमत आहे. लहान वयातच मुलांवर पुस्तक वाचन, श्रमाचे संस्कार होणे आवश्यक आहे, असे श्री. लेले यांनी केले. Honoring the meritorious
कार्यक्रमात व्यासपीठावर मंडळाच्या कोषाध्यक्ष सौ. राधिका वैद्य, सदस्य सौ. केतकी जोगळेकर, डॉ. संतोष बेडेकर, अॅड. अविनाश काळे, शरदचंद्र लेले आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचा गौरव म्हणून स्वारी गडकिल्ल्यावर, सावरकर- एक झंझावात, उत्तुंग व्यक्तीशिखरे आणि यशोगीत सैनिकांचे ही पुस्तके भेट देण्यात आली. कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांसमोर अभ्यासाचे आव्हान होते, परंतु विद्यार्थ्यांनी पालक, विद्यार्थ्यांनी मनोगतामध्ये चित्पावन मंडळाचे आभार मानले. Honoring the meritorious


सत्कारप्राप्त विद्यार्थ्यांची नावे
इयत्ता पाचवी – निशा मालशे, अमेय सांड्ये, ओम कामत, रुचीर आजगावकर, स्वरूपा भाटवडेकर, दीक्षा आठल्ये, स्वरा पटवर्धन, पर्णिका परांजपे, अभिराम तगारे, पूर्वा जोशी, ब्रविम देसाई, मैत्रेयी देसाई, नील मुकादम.
इयत्ता आठवी – अनिशा आंबेकर, बिल्वा तेंडुलकर, कणाद कुलकर्णी, गायत्री जोशी, कौस्तुभ हर्डीकर, आर्या पाध्ये, वरुण दुदगीकर, अमेय पंडित, गार्गी जोशी, गुरुप्रसाद पटवर्एधन, मैत्रेय मालशे, स्वरा मुळ्ये, सार्थक सोहनी, वेदांत वेदपाठक, गार्गी करंबेळकर, भार्गवी केळकर. मधुरा करमरकर, खुशी भाके, वेदांती लिमये, सानिका केळकर. Honoring the meritorious