गुहागर, ता. 19 : तालुक्यातील आबलोली खालील पागडेवाडी विकास मंडळ व महिला (मुंबई) मंडळाच्या वतीने मुंबई स्थित विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पागडे यांच्या अध्यक्षतेखाली पाटील मारुती मंदिर ट्रस्ट सभागृह, दादर या ठिकाणी संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत जयेश पागडे यांनी मंडळाची मागील ३८ वर्षांची वाटचाल आणि भविष्यातील उपक्रम याविषयी माहिती दिली. Honoring students by Pagdevadi Mumbai Board

त्यानंतर विविध शैक्षणिक स्तरावर सुयश संपादन केलेल्या हार्दिक प्रशांत गोणबरे, निरज निलेश पागडे, अनिषा नितेश पागडे, स्वप्नजा दिपक गोणबरे, निरव निलेश गोणबरे, श्रीया राजेश गोणबरे, वीर सुनिल पागडे, आरोही दिपक पागडे, लावण्या महेश पागडे, अर्णव परेश पागडे, रूद्र शैलेश पाष्टे, आर्या लक्ष्मण पागडे, विरा सुनिल पागडे, अंश विजय पागडे, सोहम दिलीप गोणबरे, तनुज संदिप पागडे, रिद्धी सचिन पागडे, वृद्धी दिपक पागडे, रिया महेश पागडे, आयूषी दिनेश पागडे, आदीत्य रत्नाकर फटकरे, शैया शैलेश पाष्टे, तेजस संजय पागडे, आंक्षका सचिन पागडे, समिरा संतोष फटकरे, श्रीच सुनिल पागडे, तनुजा काशिराम पागडे, निधी दिलीप पागडे, इशान शैलेश पागडे, मंथन सुर्यकांत पागडे, आदित्य दिनेश गोणबरे, वरूण सुरेश गोणबरे,अदिती राजन पागडे, विवेक रमेश गोणबरे, करण दिलीप पागडे, सानिया अर्जुन पागडे, सर्वेश संतोष पागडे, एकता कृष्णा पागडे, श्रावणी कृष्णा पागडे, प्रणय चंद्रकांत पागडे, ऋतुजा अनंत पागडे तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या सलोनी शंकर गोणबरे, रोहन सचिन पागडे, प्रज्ञा प्रभाकर गोणबरे, ऋतुजा यशवंत पागडे, तनुजा काशिराम पागडे, सौ.सुहासिनी शंकर गोणबरे, ओंकार मोहन आग्रे आदी गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. Honoring students by Pagdevadi Mumbai Board

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.अमोल पवार यांनी शिक्षणाची गरज, शिक्षणातून घ्यायचा आनंद आणि विद्यार्थी – पालकांची भूमिका याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच सी. ए. महेश आंबवणे यांनी विद्यार्थ्यांची कर्तव्ये, समाज माध्यमांचा वापर आणि अभ्यासातील शिस्त समजावून दिली. उपसरपंच अक्षय पागडे, ग्रामीण मंडळाचे सल्लागार विजय पागडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतानाच मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. अध्यक्ष चंद्रकांत पागडे विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून यशस्वी व्हावे, असे आवाहन केले. Honoring students by Pagdevadi Mumbai Board

यावेळी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पागडे, सल्लागार यशवंत पागडे, गणेश बारस्कर, विजय पागडे, मार्गदर्शक प्रा.अमोल पवार, सी. ए. महेश आंबवणे, उपसरपंच अक्षय पागडे, दिलीप पागडे, सुहासिनी गोणबरे, कृष्णा पागडे, सुनील पागडे, संतोष फटकरे, सुशांत पागडे, काशीराम पागडे, जयेश पागडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव सुनील पागडे यांनी तर आभार प्रदर्शन जयेश पागडे यांनी केले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी, पालक यांसह मंडळाचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे पदाधिकारी सभासद यांनी विशेष मेहनत घेतली. Honoring students by Pagdevadi Mumbai Board

