अमृत महोत्सवानिमित्त कोतळूक ग्रामपंचायतीचे वतीने आयोजन
गुहागर, ता. 21 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कोतळूक ग्रामपंचायतीच्या वतीने स्वातंत्र्यापूर्वी जन्मलेल्या ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ( १९४७ पूर्वी ) जन्मलेले गावातील ७५ जेष्ठ ग्रामस्थांचा सन्मान केला. Honoring Senior Citizens in Kotaluk

ना. गोपाळकृष्ण गोखले जन्मभूमी ओळख असलेल्या आदर्श गाव कोतळूक मध्ये हर घर तिरंगा अभियानांतर्गत विविध स्तरांवर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. निर्मल ग्रामपंचायत कोतळूकच्या वतीने १५ऑगस्टच्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालय येथे १९४७ पूर्वी जन्म झालेल्या ७५नागरीकांना शाल, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच तालुकास्तरीय समूह गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त कोतळूक केंद्रातील शिक्षकांनी गायन सादर करून दाद मिळवली. त्यांचाही सत्कार कोतळूक ग्रामपंचायत वतीने करण्यात आला. Honoring Senior Citizens in Kotaluk

यावेळी सरपंच सौ उर्मिला गोरिवले, उपसरपंच संजीवनी जावळे, माजी सभापती विलास वाघे, गणपत शिगवण, पंचायत समिती माजी सदस्य लक्ष्मण शिगवण, ग्रामपंचायत सदस्य सचिन ओक, विजय भेकरे, शितल गोरिवले, सेजल शिगवण, संचिता गुरव, पोलिस पाटील अनुजा वाघे, संचिता मोहिते, ग्रामविकास अधिकारी मोहन घरत, श्री झोलाई वाघजाई देवस्थान समितीचे अध्यक्ष सुनिल भेकरे, सोसायटी चेअरमन पांडुरंग कावणकर, व्हा. चेअरमन अनंत चव्हाण, माजी सरपंच सुरेश गोरिवले, माजी उपसरपंच शिवराम मोहिते, बचत गट सीआरपी नम्रता भेकरे, अंकिता गुरव, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. Honoring Senior Citizens in Kotaluk
