गुहागर, ता. 18 : श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर सदानंद सुदाम पाटील शास्त्र श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य व कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय, गुहागर मध्ये माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2023 मध्ये 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच संपन्न झाला. Honoring Guhagar High School meritorious students


यावेळी आर्या पावसकर, कनिष्का बावधनकर, यश शिर्के, हर्षदा नारकर, स्मित गमरे, अथर्व राऊत, श्रेयल वंजारी, सृष्टी माटल, जान्हवी मायदेव, समृद्धी मोहिते, श्वेता कदम, वेदिका बोले, ऋषिकेश आठवले, प्रज्ञा घाणेकर, साईराज पडवळ, साईराज आरेकर, स्वरा सोलकर, मुग्धा गमरे, पार्थ साखरकर, विघ्नेश जाधव, धनश्री कळझुणकर, शुभम दाभोळकर, समर्थ बंदिछोडे, अनुजा घाडे, शंतनु रांजाणे, सिद्धी सोलकर, पार्थ कदम या विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत परीक्षेत 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त केल्याबद्दल संस्थेच्या वतीने पुस्तक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आर्या पावसकर, मुग्धा गमरे, शंतनु रांजाणे या विद्यार्थ्यांनी तसेच श्री. समीर पावसकर सर, श्री. बागकर या पालकांनी आपल्या मनोगतातून संस्था व शाळेचे आभार मानले. Honoring Guhagar High School meritorious students


या कार्यक्रमासाठी संस्थेचे सीईओ तसेच स्कूल कमिटी अध्यक्ष श्री. दीपक कनगुटकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक श्री. पराग भोसले, श्री प्रभुनाथ देवळेकर, मुख्याध्यापक श्री. एस. एस. कांबळे, उपमुख्याध्यापक श्री. व्ही. एस. कोरके, विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ज्योती देवकर यांनी केले. श्री.जी. एच. पाडवी यांनी आभार मानले. Honoring Guhagar High School meritorious students