गुहागर, ता. 03 : विद्यार्थी शिकला की, संपूर्ण समाज व कुटुंब सुशिक्षित होत असतो. म्हणून माणसाच्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्वाचे स्थान असल्याचे मत श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांनी व्यक्त केले. ते श्री समर्थ भंडारी पतसंस्थेच्या ज्ञानरश्मी वाचनालय येथील डॉ. तानाजीराव चोरगे सभागृहात आयोजित दहावी, बारावी, शिष्यवृत्ती व इतर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात बोलत होते. Honored by Samarth Bhandari Credit Institution
प्रभाकर आरेकर पुढे म्हणाले की, शिक्षणाने माणूस संस्कृत बनतो. समाजाचा विकास होतो. तुम्ही शिकलात तर आपल्या गावाचा विकास होईल. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केल्यास पुढील शिक्षणासाठी त्यांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. म्हणून यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार हा झालाच पाहिजे, असे शेवटी प्रभाकर आरेकर म्हणाले .या कार्यक्रमाला श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर या शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालिका स्मिता आरेकर, पराग आरेकर भंडारी समाजाचे खजिनदार तुषार सुर्वे, निलेश मोरे, श्रीधर बागकर, विद्यार्थी व पालक वर्ग तसेच बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक देवकर यांनी केले. Honored by Samarth Bhandari Credit Institution