रत्नागिरी, ता. 08 : क्षत्रिय मराठा मंडळातर्फे वर्धापनदिनी मराठा समाजातील ७५ वर्षे व ९० वर्षांवरील ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. तसेच विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी, व्यक्तींना गौरवण्यात आले. टीआरपी येथील अंबर हॉल येथे हा सोहळा झाला. या वेळी व्यासपीठावर अध्यक्ष सुरेशराव सुर्वे, कार्याध्यक्ष राकेश नलावडे, उपाध्यक्ष प्राची शिंदे, खजिनदार जितेंद्र विचारे आणि प्रचार प्रमुख संतोष तावडे उपस्थित होते. Honored by Kshatriya Maratha Mandal
२०२२ च्या राज्य सेवा स्पर्धा परीक्षेचे तीनही टप्पे पूर्ण करून ५७६ गुणांसह महाराष्ट्रात ६३ वा क्रमांक मिळवून निवड यादीनुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी/ गटविकास अधिकारी (वर्ग १) प्राप्त ऋषीकेश शेखर सावंत यांचा विशेष सत्कार केला. त्यांनी मनोगतामध्ये मंडळाचे आभार मानत इयत्ता सातवी- आठवीपासून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन करून स्वतःचा स्पर्धात्मक प्रवास उलगडून सांगितला. Honored by Kshatriya Maratha Mandal
७५ वर्षे पूर्ण केलेले आजीव सभासद- सौ. वंदना देसाई, चंद्रकांत साळवी, सुरेश जाधव, कमलाकर साळवी, सौ. अश्विनी साळवी, सुरेश चव्हाण, शुभांगी देसाई, विलास साळवी, जयवंत विचारे, विजय सावंतदेसाई व वनिता आयरे. ९० वर्षांवरील सत्कारमूर्ती- निर्मला सावंत, शालिनी सावंत, मंदाकिनी सावंत, बाळकृष्ण सावंतदेसाई, भिकाजी विचारे, जयश्री नाईक. Honored by Kshatriya Maratha Mandal
विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी- अपूर्वा ढवळे, सोहम चव्हाण, श्रीरंग आयरे, आराध्या शिंदे, अजिंक्य घोसाळकर, आदित्य वाघचवरे, अंश भावे, वरद राणे, खुशी सावंत, अनुष्का वाघचवरे, माही सावंत, वेधा सावंत, श्रीया परब, स्वरा इंदुलकर, अदिती कदम, हर्षवर्धन पाटील, सौ. अश्विनी पाटील, प्रभात निकम, डॉ. विक्रांत पाटील, सीएस प्रणव यादव, वैभवी पवार, मैत्रेयी खानविलकर, श्रद्धा खानविलकर, वैष्णवी नलावडे, नेहा धुळप, योगेंद्र तावडे, सानवी पवार, यश खानविलकर, विराज देसाई, वेदांत देसाई, स्वप्नील तळेकर, अन्वयी कदम, साईश्री नलावडे, आकार कदम, सानवी देसाई, दिग्वीजय चौघुले, जिया चव्हाण. Honored by Kshatriya Maratha Mandal
स्पर्धांमधील विजेते
हस्ताक्षर स्पर्धा-
इयत्ता पहिली ते सहावी मराठी- विधित सावंत, इयत्ता पहिली ते सहावी इंग्रजी- रोनक सावंत, ज्येष्ठ नागरिक मराठी- सूर्यकांत सावंत, इयत्ता पहिली ते सहावी चित्रकला स्पर्धा- शार्दुल तावडे, इयत्ता सातवी ते नववी वक्तृत्व स्पर्धा- शुभंकर विचारे, दहावी ते बारावी वक्तृत्व स्पर्धा – कुणाल जाधव, योगेंद्र तावडे,
वक्तृत्व स्पर्धा – वयोगट १८ ते २५- कश्मिरा तावडे.
सामान्य ज्ञान – सहावी ते दहावी- अनुज पाटील, हर्षवर्धन पाटील.
रिल मेकिंग स्पर्धा- दुर्वा देसाई. वर्धापनदिन विशेषांकासाठी मुखपृष्ठ स्पर्धा आयोजित केली. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र साकारून प्रथम क्रमांक वरद साळवी याने पटकावला. त्याचाही सत्कार करण्यात आला. Honored by Kshatriya Maratha Mandal