गुहागर, ता. 21 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने नुकताच पंचायत समिती शिक्षण विभागामध्ये सर्व प्राथमिक शाळांमधून विद्यार्थ्यांच्या मार्फत चांगल्या प्रकारचे निधी संकलन करून दिल्याबद्दल सर्व केंद्रप्रमुखांचा सन्मान चिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. दि. 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग सहाय्यता दिनाचे औचित साधून हा कार्यक्रम कार्यक्रम करण्यात आला. Honored by Center Pramukh by Disabled Rehabilitation Institute

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री उदय रावणंग, उपाध्यक्ष प्रा. प्रकाश अनगुडे, विस्तार अधिकारी चिखली बीटचे श्री रायचंद्र गलवे, विस्तार अधिकारी अडूर बिट श्री संजय गोखले, सल्लागार श्री श्रीकांत वेल्हाळ, श्री किरण शिंदे तसेच प्रत्येक केंद्राचे 20 केंद्रप्रमुख उपस्थित होते. या सर्व केंद्रप्रमुखांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे. Honored by Center Pramukh by Disabled Rehabilitation Institute

या संस्थेला 21 वर्षे पूर्ण झाली असून संस्थेत सर्व प्रकारचे 1400 हुन अधिक दिव्यांग सभासद आहेत. संस्थेला कोणतेही अनुदान मिळत नाही. संस्थेने गेल्या 21 वर्षात लोकसहभागातून तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय विविध उपक्रम व कार्यक्रम यशस्वीपणे राबविले आहेत व राबवीत आहे. या कार्यक्रमाचे औचित साधून 3 डिसेंबर 2023 या जागतिक दिव्यांग सहाय्यता दिनानिमित्त सन 2023-24 या वर्षाकरिता संस्थेच्या निधी संकलनासाठी निधी कार्डचे वाटप केंद्रप्रमुखांना करण्यात आले. श्री शार्दुल सर केंद्रप्रमुख यांनी संस्थेचे कौतुक केले. संस्था सर्व प्रकारच्या दिव्यांगांसाठी तसेच गरीब होतकरू विद्यार्थी तसेच तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी विशेष काम करीत आहे. त्यामुळे यापुढेही सर्वच केंद्रातून चांगल्या प्रकारचे निधी संकलन केले जाईल, असे सांगितले व सर्वांचे आभार मानले. Honored by Center Pramukh by Disabled Rehabilitation Institute

यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री उदय रावणंग यांनी शिक्षण विभाग पंचायत समिती, गुहागर कडून संस्थेसाठी चांगले सहकार्य मिळत असल्यामुळे सर्व केंद्रप्रमुख, सर्व विस्तार अधिकारी व माननीय गटशिक्षणाधिकारी श्रीमती भागवत मॅडम यांचे तसेच प्रत्येक शाळेचे सर्व मुख्याद्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांचे संस्थेच्या वतीने आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन संस्थेचे सल्लागार श्री किरण शिंदे यांनी केले. त्यांनी यावेळी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात निधी संकलन करुन देण्यासाठी माननीय केंद्रप्रमुखांना विनंती केली. Honored by Center Pramukh by Disabled Rehabilitation Institute
