जागतिक महिला दिननिमित्त गुहागर हायस्कूल येथे संपन्न
गुहागर, ता. 10 : नेहरू युवा केंद्र रत्नागिरी व महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर एज्युकेशन सोसायटी संचलित श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालय गुहागर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. Honor of Women at Guhagar High School
यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या उपमुख्याध्यापिका सुजाता कांबळे, लेखिका मनाली बावधनकर, सावंत मॅडम, गोयथळे मॅडम, राधा शिंदे, बाणे मॅडम, पालशेतकर मॅडम, खानविलकर मॅडम, शामल आरेकर मॅडम, कनगुटकर मॅडम, माने मॅडम, परचुरे मॅडम, ठाकूर मॅडम, पाकळे मॅडम, सागवेकर मॅडम, भाटकर मॅडम, स्वामिनी भोसले मॅडम या कनिष्ठ महाविद्यालय गुहागर श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालय व प्राथमिक विद्यामंदिर मधील सर्व शिक्षिकांचा शाल, प्रशस्तीपत्रक, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. Honor of Women at Guhagar High School


त्यावेळी मनोज पाटील म्हणाले की, आज महिला सर्वच पदांवरती सन्मानाने विराजमान झालेल्या आहेत. राष्ट्राच्या प्रगतीसाठी महिलांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. .महिला समर्पण वृत्तीने, प्रामाणिकपणे काम करतात, म्हणून त्यांना सर्व क्षेत्रात यश लाभत आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष मनोज पाटील, सल्लागार संदीप भोसले, संचालिका शामल आरेकर, कायदेशीर सल्लागार एडवोकेट शेंबेकर, विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका सुजाता कांबळे, पर्यवेक्षक मधुकर गंगावणे, सर्व शिक्षक वृंद व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर गंगावणे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन सौ मनाली बावधनकर यांनी केले. Honor of Women at Guhagar High School