१०० टक्के वसुली यशस्वीतेबद्दल कर्मचाऱ्यांचा सन्मान
गुहागर, ता. 26 : २०२३-२४ मध्ये ग्राहकांना उत्तम सेवा देणे व वीज महसूल वसुलीचे १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण करुन यश मिळविल्याबद्दल गुहागर महावितरण उपविभागीय कार्यालय अंतर्गत वीज कर्मचाऱ्यांचा सन्मान वरीष्ठ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शृंगारतळी येथील पाटपन्हाळे ग्रा.पं.च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. Honor of Guhagar Mahavitraan employees
या कार्यक्रमाला चिपळूण कार्यकारी अभियंता लवेकर, उप कार्यकारी अभियंता अशोक मोहिते, काजरोळकर साहेब उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह, पदक व पुष्गुच्छ देऊन गौरविण्यात आले. शाखा अभियंता कलशेट्टी, शिंदे, अल्विन, यादव मॅडम, बिलिंग प्रमुख आखाडे लाईनमन, तसेच लाईन स्टाफ यांचे याकामी योगदान लाभले. सलग दोन वर्षे गुहागर तालुक्यातील घरगुती, व्यापारी व औद्योगिक थकबाकी शुन्य झाली असून विशेष करुन अशोक मोहिते यांनी यशस्वी प्रयत्न करुन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करुन ही वसुली मोहिम राबविली. Honor of Guhagar Mahavitraan employees
गुहागर तालुक्यात १ मार्चपासून वसुलीला सुरुवात झाली होती. पालशेत विभागातील मुसलोंडी, वाडदई, शृंगारतळी विभागातील वाकी-पिंपळवट, वेळंब- पांगारी व किरवलेवाडी, आबलोली विभागात गोणबरेवाडी, मोहितेवाडी, आंबेर खुर्द या गावांमध्ये वसुलीचे उद्दीष्ट मार्च मध्येच पूर्ण झाले होते. वास्तविक या वसुलीसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेतली होती. उर्वरित गावांमध्ये वसुली मोहीम अशोक मोहिते आणि कर्मचाऱ्यांनी सुरु केली होती. अखेर हे वसुलीचे १०० टक्के उद्दीष्ट पूर्ण झाले असून मोहिते यांनी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमामध्ये सर्व कर्मचाऱ्यांनी या वसुलीचे श्रेय अशोक मोहिते यांना दिले. Honor of Guhagar Mahavitraan employees