स्पर्धेत दिपिका राऊत विजेती; ७५ वर्षापुढील महिलांचा सहभाग
गुहागर, ता.14 : तालुक्यातील श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ, अडूर (रजि.) ही संस्था नेहमीच विविध क्षेत्राच्या माध्यमातून कार्यरत असते. यंदा श्री विठ्ठलाईदेवीच्या वार्षिक शताब्दी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सन्मान स्त्री शक्तीचा अंतर्गत होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर स्पर्धेमध्ये एकूण ५४ महिलांनी सहभाग घेतला होता. Home Minister program at Adur

बाद फेरी स्वरुपात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अखेर गावातील माहेरवाशीण सौ. दिपिका महेश राऊत अर्थात दिपिका परशुराम झगडे हिला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. त्यांना मानाची पैठणी, घरगुती वापरास योग्य वस्तुरूप भेटवस्तू व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांकावर सौ. मोहिनी मंगेश दहिवलकर यांनी नाव कोरले. त्यांना वस्तुरूप भेटवस्तू व सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. तसेच तृतीय क्रमांक सौ. कविता सुभाष साळवी यांनी प्राप्त केला. त्यांना वस्तुरूप भेटवस्तू व सन्मानचिन्ह देवून सन्मानित केले गेले. या स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे ७५ वर्षापुढील काही महिला सदस्यांचा या स्पर्धेतील सहभाग निश्चितच कौतुकास्पद होता. Home Minister program at Adur
या कार्यक्रमाचे समन्वयक व सूत्रसंचालन सचिन सुधाकर साळवी यांनी केले. सदर स्पर्धा श्री विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ, अडूर यांच्या आयोजनाखाली यशस्वपणे पार पडली. Home Minister program at Adur
