गुहागर भाजपकडून आयोजन, कर्तृत्वान महिलांचा सत्कार
गुहागर, ता. 24 : भारतीय जनता पार्टीकडून सध्या गुहागर विधानसभा क्षेत्रात महिलांसाठी होम मिनिस्टर या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमाला अभूतपुर्व प्रतिसाद मिळत आहे. सहभागी प्रत्येक महिलेला काठापदराची साडी आणि विजेत्या महिलांना पैठणी भेट दिली जात आहे. त्याचप्रमाणे आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, वाडी मंडळाच्या अध्यक्षा आदींचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपच्या प्रचाराची ही कल्पना यशस्वी होत आहे. HOME MINISTER PROGRAM ARRENEGED BY GUHAGAR BJP
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी सर्व पक्ष आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महायुतीकडून गुहागर विधानसभा भाजपला मिळणार हे या पक्षाच्या वेगवाग हालचालींवरुन दिसून येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वी झाल्यानंतर या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांशी संपर्क करण्यासाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन गुहागर विधानसभा क्षेत्रात करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जिल्हा परिषद गटामधील कार्यकर्त्यांद्वारे केले जात आहे. जिल्हा परिषद गटात एक कार्यक्रम घ्यायचा कि दोन कार्यक्रम घ्यायचे याचा निर्णयही त्या गटामधील कार्यकर्त्यांनीच करायचा आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगला कार्यक्रम कोण घेतो याची स्पर्धा सुरु झाली. HOME MINISTER PROGRAM ARRENEGED BY GUHAGAR BJP
आजपर्यंत मळण, शृंगारतळी, अंजनवेल, तळवली या पंचायत समिती गणांसह, गुहागर शहर आणि वहाळ जिल्हा परिषद गट आणि कामथे व कापसाळ या क्षेत्रातील कार्यक्रम झाले. अडूर, वेळणेश्र्वर, शीर, पडवे, खोडदे पंचायत समिती गणांच्या कार्यक्रमांचे नियोजन सुरु आहे. खेड तालुक्यात कार्यकर्त्यांची संख्या कमी असली तरी 2-3 कार्यक्रम करण्याची तयारी तेथील पदाधिकारी करत आहेत. HOME MINISTER PROGRAM ARRENEGED BY GUHAGAR BJP
दोन तासांच्या या कार्यक्रमामध्ये सर्वांना सामावून घेतले जाते. केवळ महिलांची उपस्थितीच असल्याने स्पर्धा असली तरी सामुहिक आनंद लुटण्याची संधी महिलांना मिळते. कार्यक्रमाच्या संचालिका चिपळूणच्या सौ. सखी थरवळ आलेल्या सर्व महिलांना चिंता आणि दु:ख विसरायला लावतात. खेळामध्ये यश मिळाले नाही तरी हमखास बक्षिस पदरात पडणार असते. HOME MINISTER PROGRAM ARRENEGED BY GUHAGAR BJP
शृंगारतळी येथील भवानी सभागृहात झालेला मळण पंचायत समिती गटाचा कार्यक्रम आणि गुहागरच्या भंडारी भवन मध्ये झालेला अंजनवेल पंचायत समिती गण व गुहागर शहराचा कार्यक्रम या दोघांनी गर्दीचे उच्चांक गाठले. अनेक वेळा या दोन सभागृहात सभा घ्यायची झाली तर आयोजकांना गर्दीचे नियोजन करावे लागते. परंतु गुहागरला झालेल्या कार्यक्रमातील महिलांची गर्दी तुडुंब होती असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या कार्यक्रमांमुळे भारतीय जनता पार्टीला कमळाची निशाणी हजारो महिलापर्यंत पोचवता आली. सहजपणे डॉ. विनय नातूंचा चेहरा गावागावातील घरात पोचवता आला आहे. त्याचबरोबर पंचायत समिती गणातील कार्यकर्त्यांना निवडणुकीपूर्वी कार्यप्रवण होण्याची संधी आणि यशाचा आनंद मिळाला आहे. आता या उर्जेवर आगामी निवडणुकीत गुहागर विधानसभा हे कार्यकर्ते लढवतील हे नक्की. HOME MINISTER PROGRAM ARRENEGED BY GUHAGAR BJP