संकलन : मयुरेश पाटणकर
आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. म्हणून 15 ऑगस्टला घरोघरी तिरंगा अभियानाच्या माध्यमातून आपण आपला राष्ट्रध्वज फडकविणार आहोत. या निमित्ताने आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाचा इतिहास उलगडून दाखविणारा हा लेख History of Tiranga
ध्वजाचा इतिहास (History of Tiranga)
रामायण महाभारतापासून प्रत्येक राजाचा स्वतंत्र ध्वज असायचा. प्रभु रामचंद्राच्या ध्वजाला अरूणध्वज म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या भगवा ध्वजावर सुर्याचे चित्र होते. तर महाभारतात अर्जुनाच्या रथावर कपिध्वज होता. अशी गोष्ट आहे की, युद्ध संपल्यानंतर अर्जुनाच्या रथावरील कपिध्वज उतरवला गेला. त्यानंतर त्या रथाचे भस्म झाले. इतिहासकाळात सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्यात कीर्तिध्वजाचा वापर होत असते. त्यानंतर सम्राट अशोकाने भगवा ध्वज हा साम्राज्य ध्वज म्हणून वापरला. छत्रपती शिवाजी महाराजांनीही भगवा ध्वजच आपले निशाण म्हणून वापरला. काही ठिकाणी त्याचा उल्लेख जरी पटका म्हणून किंवा शिवध्वज म्हणून आहे. इथे मुद्दाम उल्लेख करावसा वाटतो तो म्हणजे वरील सर्व ध्वजांचा रंग भगवा होता. त्यावर वेगवेगळ्या राजांनी आपली चिन्हे रेखाटली होती. History of Tiranga


इंग्रजांच्या आक्रमणाच्या काळात 1857 ला उठाव झाला. या वेळी शिवध्वजाची जागा साक्षी ध्वजाने घेतली. या ध्वज हिरव्या रंगाचा होता. त्यावर वरच्या बाजुला डाव्या कोपऱ्यात भगव्या गोलात कमळ आणि खालच्या बाजुला उजव्या कोपऱ्यात भाकरी ही चिन्हे होती.स्वातंत्र्याच्या लढ्याला संपूर्ण देशात एकाच संस्थेमार्फत दिशा मिळावी. म्हणून 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. या संस्थेमार्फत देशात विविध ठिकाणी जनजागृती मेळावे, सभा, अधिवेशने होऊ लागली. त्याकाळात प्रथमच स्वतंत्र भारताचा ध्वज कसा असावा याची चर्चा सुरू झाली. याच दरम्यान 1905 मध्ये वंग भंग ही चळवळ सुरु झाली. या चळवळीत क्रियाशील असलेल्या स्वामी विवेकानंदाच्या शिष्या भगिनी निवेदिना यांनी प्रथमच चौरस आकाराचा भगवा ध्वज, या ध्वजाच्या मध्यभागी व्रज स्वरुप चिन्ह आणि वंदे मातरम ही अक्षरे लिहिलेली होती. तसेच ध्वजाच्या चारही बाजुला दिव्यांचे चित्र होते. हा ध्वज फारसा वापरला गेला नाही.1906 मध्ये कलकत्यामध्ये झालेल्या एका जनसभेत आयताकृती हिरवा (सर्वात वर त्यावर 8 पांढरी फुले), पिवळा (मध्यमागी त्यावर वंदे मातरम्अशी अक्षरे) आणि लाल (खालच्या बाजुला त्यावर सूर्य आणि चंद्र) असे तीन रंगांचे पट्टे असलेला एक ध्वज फडकविला गेला. History of Tiranga
22 ऑगस्ट 1907 मध्ये जर्मनीत आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसचा मेळाव्यात मॅडम कामा (kama)यांनी वर उल्लेख केलेल्या रंगसंगतीमधील फक्त चिन्हांमध्ये थोडासा बदल असलेला ध्वज फडकविला. त्यानंतर गदर पार्टीनेही ही रंगसगती कायम ठेवताना त्यातील सर्व चिन्हे काढून त्या ठिकाणी दोन तलवारी असलेला ध्वज तयार केला होता. होमरुल चळवळीच्या काळात 1917 मध्ये ॲनी बेझंट (Annie Besant) यांनीही एक वेगळा ध्वज सर्वांसमोर सादर केला होता. महात्मा गांधींजींच्या (Mahatma Gandhi) काळात वरच्या बाजुला पांढरा पट्टा, मध्ये हिरवा पट्ट आणि खाली लाल पट्टा आणि या मध्यभागी निळ्या रंगात चरखा अशा ध्वजाची निर्मिती झाली. History of Tiranga
1929 साली पंडित जवाहरलाल नेहरु (Pandit Jawaharlal Nehru) राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर वर केशरी, मध्ये पांढरा आणि खाली हिरवा असे पट्टे असलेला आणि मध्यमागी निळ्या रंगात चरखा असलेला ध्वज तयार करण्यात आला. हाच ध्वज पुढे 1940 पर्यंत दिर्घकाळ प्रत्येक आंदोलनात वापरण्यात आला. हा ध्वज पिंगली वैकय्या (Pingli Vaikayya)यानी बनविला होता. History of Tiranga


तिरंगा राष्ट्रध्वज (History of Tiranga)
1940 च्या दरम्यान दुसऱ्या महायुध्दादरम्यान ब्रिटिश साम्राज्याला धक्के बसु लागले. भारतामध्ये स्वातंत्र्याची चळवळही प्रखर झाली होती. त्यामुळेच अखेर जून 1947 मध्ये इंग्रजांनी भारत सोडण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्य मिळणे आता फार दूर नाही हे लक्षात आल्यावर राष्ट्रीय काँग्रेसने स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज निश्चित करण्यासाठी एक समिती नेमली. या समितीने सौ. सुरय्या बद्रुदिन त्याबी (Mrs. Surayya Badrudin Tyabi) यांनी तयार केलेला तिरंगा स्विकारला. History of Tiranga 22 जुलै 1947 रोजी या तिरंगा ध्वजाला राष्ट्रध्वज म्हणून भारताच्या विधिमंडळ सदस्यांनी मान्यता दिली. 14 ऑगस्टला रात्री 12 वा. लॉर्ड माऊंटबॅटन (Lord Mountbatten) ह्यांनी पार्लमेंट हाऊसवरील (दिल्लीतील संसद भवन) युनियन जॅक उतरविला. त्यानंतर विधी मंडळामध्ये पंडित जवाहरलाल नेहरु (Pandit Ja waharlal Nehru) यांनी भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर विधीमंडळ सदस्या हंसाबेन मेहता (Hansaben Mehta) यांनी भारताच्या घटनासमितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना तिरंगा राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक दिला. आणि 15 ऑगस्टला सकाळी सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरुंनी संसदेवर पहिल्यांदा तिरंगा फडकविला. 15 ऑगस्टला दुपारी 12 वा. दिल्लीतील इंडिया गेट परिसरात भारतीय जनतेच्या उपस्थित पंडित जवाहरलाल नेहरुंनी पुन्हा ध्वजारोहण केले. आणि लाल किल्ल्यावर 16 ऑगस्ट 1947 रोजी सकाळी 8 वा. पंडित जवाहरलाल नेहरुंच्या हस्ते तिरंगा राष्ट्र्रध्वज फडकविण्यात आला. History of Tiranga


काय आहे तिरंगा राष्ट्रध्वजाचा अर्थ (Meaning of Tiranga)
22 जुलै 1947 रोजी तिरंगा राष्ट्रध्वज विधिमंडळासमोर ठेवण्यात आला. त्यावेळी डॉ. राधाकृष्णन (Dr. Radhakrishnan) यांनी या ध्वजाबाबत असे सांगितले की, तिरंगा राष्ट्रध्वजावरील केशरी रंग हा वैराग्य आणि शौर्याचा निदर्शक आहे. तर पांढरा रंग प्रकाश व सत्य दर्शवितो. हिरवा रंग शेती प्रधान देशातील समृध्दीचे प्रतिक आहे. तर अशोकचक्र हे गतिशिलतेचे प्रतिक आहे. History of Tiranga
सम्राट अशोकाच्या साम्राज्यातील ध्वजावर असलेले हे चक्र आहे. यामध्ये 24 आरी आहेत. या 24 आरी प्रेम, संयम, त्याग, शील, शांति, सेवा, क्षमा, बंधुभाव, संघटन, कल्याण, समृद्धी, उद्योग, सुरक्षा, नियम, समानता, अर्थ, नीति, न्याय, सहकार्य, कर्तव्य, अधिकार, ज्ञान, आरोग्य, मैत्री हे गुण दर्शवितात. History of Tiranga