गुहागर, ता. 18 : श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर मध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कॅनरा बँकेचे शाखा अधिकारी संतोष जाधव उपस्थित होते. यावेळी राष्ट्रभाषा पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी बालबोधिनी आणि इयत्ता आठवी सुबोध परीक्षेला बसलेल्या एकूण 83 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. Hindi Divas celebrated in Guhagar High School
इ. सहावीतील पल्लवी दिलीप घाडे ही कोल्हापूर विभागात बालबोधनी परीक्षेमध्ये प्रथम आल्याबद्दल शाळेकडून तिचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक कोरके, कांबळे मॅडम आणि कार्यक्रमाचे प्रमुख श्री संतोष जाधव सर यांनी हिंदी विषयाचे महत्त्व यावर आपले विचार व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी भाषण कवितेद्वारे हिंदी विषयाचे महत्त्व पटवून दिले. Hindi Divas celebrated in Guhagar High School
यावेळी विद्यालयातील गंगावणे सर, मिनल खानविलकर मॅडम, ज्योती माने मॅडम, साबळे सर, कतकर सर उपस्थित होते. सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री कांबळे सर आणि शाळा समितीचे अध्यक्ष दिपकजी कनगुटकर साहेब यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुमारी सनिष्का रोहिलकर आणि कु.आर्या तुळसूणकर यांनी केले. आभार प्रदर्शन कु. सान्वी विचारे हिने केले. Hindi Divas celebrated in Guhagar High School