गुहागर, ता. 15 : खेड येथील दिपक नोव्होकेम टेक्नॉलॉजीस कंपनीकडून तळवली हायस्कुलसाठी तीन संगणक संच, एक प्रिंटर व एक प्रोजेक्टर देणगी स्वरूपात देऊन मदत केली. याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली यांचेकडून कंपनीने अधिकारी श्रीकृष्ण सावंत यांचा सत्कार करण्यात आला. Help from the company to Talavali School
तळवली प्रशालेत परिसरातील आठ-नऊ गावांमधील सुमारे साडे चारशे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. परंतु आधुनिक काळात गतिमान कामकाज करण्यासाठी वरील वस्तुंची अत्यावश्यकता होती. यासाठी माजी विद्यार्थी हेमंत चव्हाण यांनी या कंपनीशी संपर्क साधला होता. त्यामुळे व सततच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य होऊ शकले. Help from the company to Talavali School

दिपक नोव्होकेम कंपनीचे अधिकारी श्रीकृष्ण सावंत, बर्णाली शेनगुप्ता व अनिल अकुलकर यांनी स्वतः प्रशालेला भेट देऊन पाहणी केली व चर्चा केली. मुख्याध्यापक श्री बसवंत थरकार यांनी त्यांना प्रशालेची सविस्तर माहिती दिली. परिसरातील आठ ते दहा गावांमधील विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून येथे आय सी टी लॅब नसल्याने विद्यार्थी संगणक ज्ञानापासून वंचित रहात आहेत. कंपनीकडून आणखी मदत मिळाली तर विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होऊ शकते. यावर प्रतिक्रिया देताना श्रीकृष्ण सावंत साहेब यांनी तुमच्या मागणीचा जरुर विचार केला जाईल. तसेच लवकरच आपल्याला याविषयी कळवले जाईल असे त्यांनी सांगितले. Help from the company to Talavali School
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक बसवंत थरकार यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप चव्हाण, युवा कार्यकर्ते हेमंत चव्हाण, जेष्ठ शिक्षक उत्तम कचरे, प्रा अमोल जड्याळ, कला शिक्षक श्रीनाथ कुळे, लिपिक उत्तम पवार, माजी विद्यार्थी दत्ताराम धनावडे, अक्षय चव्हाण आदि उपस्थित होते. Help from the company to Talavali School
