वैद्यकीय टीमच्या प्रयत्नाने 8 ते 10 लाखाच ऑपरेशन मोफत
गुहागर, ता.14 : गुहागर तालुक्यातील बांधवासाठी नेहमीच तत्पर असणारे, भावी नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते, मुंबई गाव किंवा इतर ठिकाणी कोणाला काहीही वैद्यकीय मदत लागली तर मदत करणारे भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, समाजसेवक संतोष दादा जैतापकर. त्यांच्या वैद्यकीय टीमचे कार्य खूप महान आहे. याच्या वैद्यकीय टीम च्या प्रयत्नाने पाभरे गावातील तरुण मुलाचं 8 ते 10 लाखाच ऑपरेशन मोफत मध्ये करण्यात आले. Help from Jaitapkar to the needy in Pabhare

पाभरे गावातील सालकाची वाडी मधील रुग्ण श्री तेजस शांताराम पास्टे हा गेले 2 ते 3 वर्ष पोटाच्या विकाराने त्रस्त झाला होता. त्याला वैद्यकीय उपचारासाठी मदतीची गरज होती. याबाबत श्री अनंत पास्टे यांनी संतोष दादा जैतापकर यांना सर्व माहिती दिली. लगेच जैतापकर याची वैद्यकीय टीम कामाला लागली. वैद्यकीय टीम प्रमुख श्री काशीराम पास्टे यांनी सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याला मुंबई जे जे हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आले. कोले्कटॉमी क्लोजर याच ऑपरेशन करायचं होत. जनरल मुख्य डॉ अन्सारी यांच्या डॉ आकांशा आणि टीम ने उत्तम ऑपरेशन पार केले. यावेळी विशेष सहकार्य मायभूमी फाऊंडेशन अध्यक्ष काप साहेब, संतोष जाधव साहेब, रघुनाथ पोस्तुरे साहेब, देवेंद्र गोठलं साहेब, मितेश घडशी साहेब, मनोज डाफले साहेब, आणि संतोष दादा जैतापकर यांच्या वैद्यकीय टीम च मोठं सहकार्य लाभले. Help from Jaitapkar to the needy in Pabhare
आता पर्यंत गुहागर तालुक्यातील पेशंट साठी वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाखाच्या पेक्षा जास्त निधीची मदत संतोष दादा जैतापकर याच्या वैद्यकीय टीम मार्फत झाली आहे. अशा सामाजिक कार्याबद्दल तालुक्यातील जनता कौतुक करत आहेत. Help from Jaitapkar to the needy in Pabhare
