अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या वतीने
रत्नागिरी, ता.06 : शहरातील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने जुना माळनाका येथील रा. भा. शिर्के प्रशालेस शैक्षणिक उठावाअंतर्गत दहा हजार रुपयांची देणगी नुकतीच प्रदान केली. प्रभारी मुख्याध्यापक आर. बी. चव्हाण यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी शिक्षक नथुराम देवळेकर यांच्यासह चित्पावन मंडळाचे कार्यवाह राजेंद्र पटवर्धन, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, सदस्य अनंत आगाशे, मोहन पटवर्धन आदी उपस्थित होते. Help from Chitpavan Brahmin Mandal

गेली अनेक वर्षे ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शाळांना विविध सोयीसुविधांसाठी निधीची गरज असते. विद्यार्थ्यांसाठी गणवेश असो व प्रयोगशाळा, ग्रंथालयाकरिता मदतीची गरज असते. याची जाणीव ठेवून चित्पावन मंडळाने शहरातील काही शाळा, संस्थांची निवड केली. यामध्ये रा. भा. शिर्के हायस्कूललाही मदत देण्यात आली. याबद्दल शिर्के हायस्कूल आणि शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाचे आभार मानले. Help from Chitpavan Brahmin Mandal

