अपघातानंतर जखमींवर तात्काळ उपचारासाठी एमएसआरडीसीचा निर्णय
गुहागर, ता. 30 : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच आहे. या महामार्गावर दर दोन दिवसांने भीषण अपघाताच्या घटना समोर येत आहेत. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून याठिकाणी झालेल्या अपघातामध्ये अनेकांचे प्राण गेले तर अनेक जखमी झाले आहेत. या अपघाताच्या घटना लक्षात घेता राज्य सरकारने समृद्धी महामार्गाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. समृद्धी महामार्गावर आता हेलिपॅड बांधण्यात येणार आहे. Helipad to be constructed on Samriddhi Highway


महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर हेलिपॅड बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गावर 16 ठिकाणी हेलिपॅड बांधण्यात येणार आहे. महामंडळाने यासाठी आराखडा तयार केला आहे. प्रस्तावित आराखड्यानुसार पहिले हेलिपॅड खर्डी ते इगतपुरी दरम्यान महामार्गाच्या बोगद्या विभागाजवळ असेल. या हेलिपॅडचे बांधकाम लवकरच सुरु होणार आहे. Helipad to be constructed on Samriddhi Highway


समृद्धी महामार्गावर अपघात झाला किंवा इतर काही घटना घडल्यानंतर तातडीने एअर अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून जखमींना तात्काळ योग्य उपचार मिळावेत यासाठी हे हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत. या हेलिपॅडमुळे एअर अॅम्ब्युलन्सने जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करणं शक्य होणार आहे. यासंबंधीच्या निविदा अंतिम करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. लवकरच या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. भविष्यात या हेलिपॅडची संख्या वाढवून 22 वर नेण्यात येईल, असे देखील सांगण्यात आले आहे. Helipad to be constructed on Samriddhi Highway