गुहागर, ता. 14 : तालुक्यातील मा.ल.भा.हेदवकर विद्यानिकेतन हेदवी या प्रशाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. परिक्षेला एकूण 87 विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विशेष प्राविण्य विद्यार्थी 17, प्रथम श्रेणी विद्यार्थी 49, व्दितीय श्रेणी विद्यार्थी 19, पास श्रेणी विद्यार्थी 2. Hedvi High School 10th Result 100 percent


या हायस्कूलच्या सुरुची अभय भाटकर हिने 90.20 टक्के गुण मिळवत प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. संजना अंकुश तांडेल हिने 88.20 टक्के मिळवत द्वितीय क्रमांक, नंदन उज्वल वेल्हाळ याने 87.40 टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. विद्यालयाच्या सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. Hedvi High School 10th Result 100 percent