गुहागर ता. 21 : तालुक्यातील हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरामध्ये चोरी झाली आहे. गेल्या चार महिन्यापासून ग्रामदेवता देवस्थानांच्या दानपेटीवर चोरांनी डल्ला मारावयास सुरूवात केली आहे. चोरीमध्ये पकडले गेलेले नसलेल्या चोरांची हिंम्मत अधिक वाढली असून निर्ढावलेल्या चोरांनी श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरामध्ये देवस्थानच्या दानपेटीवर डल्ला मारला आहे. Hedavi Shri Dasabhuj Lakshmi Ganesh Temple stolen

काही महिन्यापुर्वी गुहागर तालुक्यातील सुरळ येथील पीरबाबाच्या दर्गामधील दानपेटी चोरून नेल्यानंतर दानपेटी सापडली. परंतु जंगलात असलेल्या या दर्गाच्या चोरीमधील चोर मात्र अदयाप मिळून आलेला नाही. त्यानंतर तालुक्यातील त्याच पट्टयातील आणखी तीन मंदिरामधील दानपेटी चोरून ती फोडून गावातच टाकण्याचे प्रकार या चोराने केला होता. परंतु याप्रकरणी गावानेच कोणतीही तक्रार केली नाही. मात्र मंगळवारी रात्री गुहागर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरामध्ये झालेल्या चोरीप्रकरणी देवस्थानच्यावतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. दानपेटी फोडून आतील ३ हजार रूपये चोरीस गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या देवस्थानबरोबर याच गावापासून तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या ग्रामदेवतेमधील दानपेटीही सदर चोरांनी चोरून त्यातील रक्कम चोरी केली आहे. याप्रकरणी गुहागर पोलिस निरिक्षक सचिन सावंत अधिक तपास करत आहेत. Hedavi Shri Dasabhuj Lakshmi Ganesh Temple stolen

देवस्थान कमिटीने सुरक्षीतता बाळगावी; पोलिसांचे आवाहन
दरम्यान गुहागर तालुक्यातील या वाढत्या चोरीच्या प्रकारांमुळे गुहागर पोलिस निरिक्षक सचिन सावंत यांनी तालुक्यातील सर्व देवस्थान कमिटींना आपल्या मंदिर, प्रार्थनास्थळे, पुतळे याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सुचना केली आहे. मंदिरातील दानपेटीतील रक्कम दररोज काढण्यात यावी. मंदिरात गावातीलच ग्रामस्थांनी सुरक्षेच्या दृष्टीने एखादया व्यक्तीची नेमणुक करावी. मंदिराचा दरवाजा व गाभारा दरवाजा मजबूत करून घ्यावा. आदी सुचना संबधीत देवस्थान यांना केल्या आहेत. Hedavi Shri Dasabhuj Lakshmi Ganesh Temple stolen
