• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 December 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

हरकती व सूचनांवर जुलै महिन्यात सुनावणी

by Mayuresh Patnakar
June 22, 2023
in Guhagar
134 1
0
हरकती व सूचनांवर जुलै महिन्यात सुनावणी
263
SHARES
752
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर नगरपंचायत, विकास आराखड्याच्या चौथा टप्पाची कार्यवाही सुरू

गुहागर, ता. 22: नगरपंचायतीने जाहीर केलेल्या विकास आराखड्यावरील दाखल झालेल्या १५०१ हरकती व सूचना अर्जावर १० जुलै ते १३ जुलै या कालावधीत सुनावणी घेण्यात येणार आहे.  एकूण ७ भागांमध्ये या अर्जांची सुनावणी घेतली जाणार आहे. Hearing on objections and suggestions of Municipal Council in July

नगरपंचायत विकास आराखडा जाहीर झाल्यावर, स्थानिक पुर्वापार असलेल्या घरांवर रस्ता रुंदीकरणाचे आरक्षण टाकण्यात आले. सरकारी मालकीच्या जमिनी, मालमत्ता आरक्षणाच्या कचाट्यातून सोडवल्या आणि खासगी जागांवर आरक्षणाचा वरवंटा फिरला. त्यामुळे स्थानिकांना उध्वस्त करणारा विकास आराखडाच नको असे सार्वत्रिक मत बनले.  नागरिक विकास मंच व भाजपाच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विरोध पोचवला गेला. परिणामी हरकती व सूचना घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली. रस्त्यांचे रूंदीकरणात दिलासा देण्याच्या चर्चा सुरु झाल्या. परंतु या बदलांसाठी शासकीय टप्प्यांप्रमाणे हरकती व सुचनांवर सुनावणी होणे गरजेचे आहे. Hearing on objections and suggestions of Municipal Council in July

१५०१ अर्जांच्या सुनावणीसाठी शासनाने कमिटी तयार केली.  यामध्ये 4 निवृत्त अधिकारी, नगराध्यक्ष आणि एका नगरसेवकाचा समावेश होता. लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्याने आता उर्वरित समिती सदस्य नगपंचायतीमधील प्रशासकीय अधिकार्यांना सोबत घेऊन सुनावणी घेणार आहेत. Hearing on objections and suggestions of Municipal Council in July

सुनावणीचे नियोजन करतांना 1501 अर्जांची विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये 12 मिटर रुंदीचे आरक्षण असलेल्या रस्ते व पाखाड्यांवर 284 शहरवासीयांनी हरकती नोंदवल्या आहेत. 9 मिटर रुंदीचे आरक्षण असलेल्या पाखाड्या व रस्ते यावर 74 हरकती आहेत. आरक्षित हरित, निवासी क्षेत्रांना आक्षेप घेणारे 121 अर्ज, आरक्षित जागांना आक्षेप घेणारे 51 अर्ज, वैयक्तिक 103 अर्ज अशी विभागणी आहे.  या १५०१
अर्जदारांपैकी सुमारे १५० अर्जदार मुंबई व पुणे येथील रहिवाशी आहेत. १० जुलै ते १३ जुलै या चार दिवसांत,  एकावेळी  एकाच विषयावर हरकती व सूचना घेतलेल्या ४० नागरिकांना बोलावण्यात आले आहे. अर्धा तासाच्या कालावधीत त्यांना त्यांचे म्हणणे मांडायचे आहे.  यासंबंधीची पत्रे नागरिकांना पाठवण्यास सुरुवात झाली आहे. Hearing on objections and suggestions of Municipal Council in July

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHearing on objections and suggestions of Municipal Council in JulyLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share105SendTweet66
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.