जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या सूचना, गुहागरमध्ये आरोग्य आढावा बैठक
गुहागर, ता. 25 : प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्तरावर दर शनिवारी आरोग्य मेळावा थीमप्रमाणे आयोजित करण्याच्या सूचना गुहागर दौऱ्यास जिल्हा आरोग्य अधिकारी अनुरुध्द आठल्ये यांनी गुहागर तालुका आरोग्य विभागाला केल्या आहेत. Health meeting at Primary Health Centre
गुहागर पंचायत समितीच्या सभागृहात दि. १९ रोजी आरोग्य विभागाची तालुकास्तरीय आढावा सभा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आरोग्याच्या सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. यावेळी सर्व उद्दीष्ट वेळेत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना केली. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचा आढावा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ महेंद्र गावडे यांनी घेतला. जास्तीत जास्त ग्रामपंचायती टी. बी. मुक्त करण्याची सूचना त्यांनी केली. साथरोग सर्वेक्षण निरंतर चालू ठेवण्याची सूचना देण्यात आली. पात्र गरोदर मातांना आरोग्य योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे सांगितले. Health meeting at Primary Health Centre

सभेच्या सुरवातीला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घनःश्याम जांगिड यांनी डॉ. आठल्ये व डॉ महेंद्र गावडे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सभेसाठी तालुक्यातील सर्व आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा गट प्रवर्तक उपस्थित होते. सभा यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य विभागातील भालेकर, सागर मोरे, सचिन चौगुले, अक्षय गावडे, श्रध्दा पवार, उषा जाधव व श्री धोत्रे, वराडकर यांनी सहकार्य केले. Health meeting at Primary Health Centre
