• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीमध्ये महाआरोग्य मेळावा संपन्न

by Manoj Bavdhankar
February 10, 2023
in Health, Ratnagiri
73 0
0
Health fair in Ratnagiri
142
SHARES
407
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सर्वसामान्यांसाठी मेळावा लाभदायक – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी ता. 10 : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यात आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून रत्नागिरीमध्ये महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घेतला असून सर्वसामान्यांचा आजारपणामुळे होणारा आर्थिक भार थोडासा हलका करण्याच्या दृष्टीने महाआरोग्य मेळावा महत्वाचा ठरणार आहे, असे  राज्याचे उद्योग मंत्री  तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रतिपादन केले. या महाआरोग्य मेळाव्याचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे केले त्यावेळी ते बोलत होते. महाआरोग्य मेळाव्याचे दामले विद्यालय, मारुती मंदीर, नाचणे रोड येथे  आयोजन करण्यात आले होते. Health fair in Ratnagiri

यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये आदि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी महाआरोग्य मेळाव्याची प्रत्यक्ष पाहणी केली.  महाआरोग्य मेळाव्यामधील उपचार करणारे डॉक्टर्स व उपस्थित नागरिक यांच्याशी संवाद साधला. Health fair in Ratnagiri

राज्यात हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना 500 मोफत दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत.  या माध्यमातून जनतेला मोफत आरोग्य सुविधा मिळणार आहेत अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.  आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या आरोग्य यंत्रणा व प्रशासन यांना यावेळी पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.  Health fair in Ratnagiri

https://ayurzeal.com/
मणक्यांच्या आजारावर प्रभावशाली उपचार, संपर्कासाठी इथे क्लिक करा.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या महाआरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या ठिकाणी अवयव दान, देहदान, नेत्रदान नोंदणी  कक्ष, रक्तदान शिबीर, आभा कार्ड  व आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड नोंदणी, नेत्र तपासणी, कान, नाक, घसा तज्ज्ञांकडून तपासणी व गरजेनुसार शस्त्रक्रिया, आरोग्य तपासणी, इसीजी व कार्डीओलॉजिस्टकडून तपासणी व जिल्हा रुग्णालयात आवश्यकता पडल्यास 2 डी इको तपासणी, जनरल सर्जरी, स्त्री रोग तज्ज्ञांकडून तपासणी, त्वचारोग व कुष्ठरोग निदान, अस्थिरोगतज्ञ तपासणी व गरजेनुसार  शस्त्रक्रिया, बालरोग तज्ज्ञ व बालरोग सर्जनकडून तपासणी व गरजेनुसार शस्त्रक्रिया, मेंदूविकार तज्ज्ञांकडून तपासणी व गरजेनुसार शस्त्रक्रिया, आयुष विभाग, असंसर्गजन्यरोग तपासणी, समुपदेशन व उपचार, एड्स कंट्रोल सोसायटी, दंत चिकित्सा व उपचार, मानसोपचारतज्ज्ञ तपासणी व उपचार केले जाणार आहेत. Health fair in Ratnagiri

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHealth fair in RatnagiriLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share57SendTweet36
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.