• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 July 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आपत्तीत आरोग्य विभागाची धाव

by Mayuresh Patnakar
July 6, 2026
in Guhagar
200 2
0
Health Department assistance in disaster
392
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पांगारी तर्फे हवेली येथे जखमींना घरपोच उपचार

गुहागर, ता. 06 : मौजे पांगारी तर्फे हवेली येथे घरावर आंब्याचे झाड कोसळून जखमी झालेल्या नागरिकांवर तळवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन तत्काळ उपचार केले. Health Department assistance in disaster

दरम्यान, तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्ती तसेच जलजन्य व कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुहागर तालुका आरोग्य विभागाने विशेष तयारी केली आहे. वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्यामुळे पाणीपुरवठा व पाणी शुद्धीकरणावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. Health Department assistance in disaster

तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून संपर्क पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जलजन्य व कीटकजन्य आजारांवरील औषधसाठा, तसेच श्वानदंश, विंचूदंश आणि सर्पदंशावरील लसींचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे तसेच अत्यावश्यक सेवेसाठी सतत सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तालुक्यातील सर्व रुग्णवाहिका कार्यरत असून ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचे नियमित शुद्धीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना घरभेटी, साथरोग सर्वेक्षण आणि आवश्यक तपासण्या नियमित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. Health Department assistance in disaster

संपर्क अधिकारी

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आरोग्य सहाय्यक राजेश जाधव (मो. ९४२१२२७८४०) यांच्यासह आबलोली, चिखली, हेदवी, कोळवली व तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. Health Department assistance in disaster

तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन

नागरिकांनी शिळे अन्न खाणे टाळावे, पाणी उकळून व गाळूनच प्यावे, घर व परिसर स्वच्छ ठेवावा. साथीच्या आजाराची लक्षणे आढळल्यास आशा सेविका किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांशी तातडीने संपर्क साधावा. आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेसाठी १०२ किंवा १०८ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. Health Department assistance in disaster

Tags: GuhagarGuhagar NewsHealth Department assistance in disasterLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share157SendTweet98
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.