• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 November 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तळवली प्रा. आरोग्य केंद्रातील हेल्थ चेकअप एटीएम मशीन सुरू

by Mayuresh Patnakar
November 28, 2026
in Guhagar
22 1
0
Health Checkup ATM Machine Launched in Talavali
44
SHARES
126
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी मानले जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आभार

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील बंद असलेले हेल्थ चेकअप एटीएम मशीन तातडीने सुरू करणे व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रिक्त असलेली आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे त्वरित भरण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी , जिल्हा परिषद रत्नागिरी यांना निवेदन सादर करण्यात आले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तातडीने हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड पिंपरी पुणे येथील कंपनीला पत्रव्यवहार करून तातडीने सदरची मशीन दुरुस्त करण्यात यावी, असे पत्र दिले होते. कंपनीकडून लगेचच तांत्रिक अभियंता ( टेक्निशियन) पाठवण्यात आला. सदरची मशीन आता पुन्हा नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली आहे. Health Checkup ATM Machine Launched in Talavali

Health Checkup ATM Machine Launched in Talavali

सदरचे मशीन सुरू झाल्यानंतर स्वतः मनसे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी पाहणी केली. तसेच तात्काळ मशीन दुरुस्ती केल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे विशेष आभार व्यक्त केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र तळवळीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल कांबळे , डॉ. प्रीतम सावंत आरोग्य सेविका मोहिनी शशिकांत पानगले , पत्रकार गणेश किर्वे, आशिष कारेकर व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. Health Checkup ATM Machine Launched in Talavali

गुहागर तालुक्यातील तळवली प्राथमिक आरोग्य केंद्र हे परिसरातील अनेक गावांतील नागरिकांसाठी महत्त्वाचे उपचाराचे साधन आहे. तळवली प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले हेल्थ चेकअप एटीएम मशीनच्या माध्यमातून रक्तदाब, रक्तातील साखर, ऑक्सिजनचे प्रमाण, हृदयाचे ठोके, बीएमआय तसेच इतर प्राथमिक आरोग्य तपासण्या करता येणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही अत्यंत उपयुक्त सुविधा ठरणार आहे. तसेच या मशीन साठी ऑपरेटर किंवा टेक्निशियन देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेविका, आरोग्य सेवक ,लॅब टेक्निशियन, शिपाई, सीएचओ , फार्मासिस्ट या रिक्त पदांमुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असून त्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील रुग्णसेवेवर होणार आहे. तेथील वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी सर्व रुग्णांना चांगली सेवा देत असले तरी रिक्त पदांची त्वरित भरती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. Health Checkup ATM Machine Launched in Talavali

या प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत पूर्ण ग्रामीण भाग असून रुग्णांची प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे येथे रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावी, त्याचप्रमाणे रिक्त पदे भरेपर्यंत पर्यायी कर्मचारी उपलब्ध करून देऊन रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. Health Checkup ATM Machine Launched in Talavali

Tags: GuhagarGuhagar NewsHealth Checkup ATM Machine Launched in TalavaliLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share18SendTweet11
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.