दि. १५ मार्च रोजी प्रकृती फाऊंडेशन, पंचायत समिती गुहागर, लाइफ केएर यांचा स्तुत्य उपक्रम
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 14 : आरोग्यदक्ष ग्राम उपक्रमांतर्गत प्रकृती फाउंडेशन पंचायत समिती गुहागर, लाइफ केएर हॉस्पिटल यांचे संयुक्त विद्यमाने आणि स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांचे सहकार्याने एकदिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आबलोली येथील खालील पागडेवाडी सभागृहात शनिवार दिनांक १५ मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी ०४ या वेळेत हे शिबीर घेण्यात येणार आहे. Health check-up camp at Aabloli Pagdewadi


यामध्ये महिला व पुरुषांची मोफत कॅन्सर तपासणी, आरोग्य तपासणी, आणि नेत्र तपासणी व दंत तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरात कॅन्सर स्पेशालिस्ट डॉ. नेहा टोपो, जनरल फिजिशियन डॉ. स्वरदा कदम यांचेसह तज्ञ डॉक्टरांची टिम उपस्थित राहणार असून या संपूर्ण शिबिराचा आबलोली गावासह आबलोली पंचक्रोशीतील जनतेने मोफत लाभ घ्यावा, असे जाहिर आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोलीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा गंगावणे यांनी केले आहे. Health check-up camp at Aabloli Pagdewadi

