यापुढेही धोरणात्मक कामे अविरतपणे करत राहणार; आ. जाधव
गुहागर, ता.27 : गुहागर युवासेना शहर आयोजित मोफत आरोग्य व तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचे आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते श्रीफळ व फित कापून करण्यात आले. शिबिरात एकूण २४७ नागरिकांचे डोळे व इतर तपासणी करण्यात आल्या. त्यामध्ये ४७ लोकांचे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियाची निवड करण्यात आली असून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. Health check up camp
या शिबिरात चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टर व परिचारिका यांच्याकडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय मोफत कर्करोग तपासणी, मोफत ईसीजी, रक्तातील साखरेची तपासणी, आहाराबाबत मार्गदर्शन, मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांना एक्सरे, सिटी स्कॅन व लॅब तपासणीवर २० टक्के सवलत मिळणार आहे. तसेच ५० टक्के सवलतीमध्ये चांगल्या दर्जाचे चष्मे दिले गेले. एकूण २४७ नागरिकांचे डोळे व इतर तपासणी करण्यात आल्या. त्यामध्ये ४७ लोकांचे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियाची निवड करण्यात आली. मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. Health check up camp
आ. जाधव यांनी युवासेनेने घेतलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचे कौतुक केले. तुम्हाला प्रेरणा मिळावी, आणि तुमच्या हातून हे चांगले काम अखंडपणे सुरू रहावे, यासाठी मी याठिकाणी आलो असल्याचे आ. जाधव म्हणाले. ते पुढे म्हणाले, गुहागर मतदार संघामध्ये गुहागरसह खेड, चिपळूण हे तीन तालुके येतात. या तिन्ही तालुक्यात उप रुग्णालये व्हावीत, यासाठी प्रयत्न केले आहेत. चिपळूण व खेड येथे झाले असून आबलोलीचे शिल्लक राहिले आहे. आता लवकरच आबलोलीचे देखील उप रुग्णालय होईल. ही रुग्णालये झाल्यावर नागरिकांना आरोग्य सेवेचा चांगला फायदा मिळणार आहे. तसेच राज्य पातळीवरच्या आरोग्य सेवा कमी किंबहुना मोफत मिळणार आहेत. डोळ्यासमोर काही विधायक दृष्टीकोन ठेवून काम करावे लागते. राजकारणात आम्ही आज आहोत, उद्या नसू, ते सर्व जनतेच्या हातात असते. आमचे काम आम्ही असू अथवा नसू, पण आम्ही केलेले काम समोर कदाचित कोणाला मान्य होणार नाहीत. मात्र, आमच्या पश्चात ते काम त्यांना मान्य करावेच लागेल. अशा प्रकारची धोरणात्मक कामे माझ्या मतदार संघात केली आहेत. यापुढेही अविरतपणे करत राहणार, असा विश्वास आ. जाधव यांनी व्यक्त केला. Health check up camp
जांगळेवाडी शाळेच्या मैदानावर घेण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराला ज्येष्ठ शिवसैनिक विनायक मुळे, तालुकाप्रमुख श्री. सचिन बाईत, उपतालुकाप्रमुख जयदेव मोरे, विलास गुरव, महिला विभाग प्रमुख सौ. सिद्धी सुर्वे, गुहागर शहर प्रमुख सिद्धिविनायक जाधव, युवासेना शहर प्रमुख राज विखारे, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक अजय खातू, उपशहर प्रमुख प्रवीण रहाटे, ग्राहक कक्ष तालुकाध्यक्ष श्री. आदेश मोरे, किरण कला मंडळ अध्यक्ष उदय लोखंडे, महिला आघाडी प्रमुख सारिका कनगुटकर, फ्रेंड सर्कल मंडळ अध्यक्ष सागर मोरे, सुधाकर सांगळे, विनायक बारटक्के, पराग मोरे, युवती शहरप्रमुख वृणाली बागकर, युवासेना उप शहरप्रमुख सोहम सातार्डेकर, प्रभूनाथ देवळेकर, प्रीती वराडकर, पुष्कर शिंदे, विवेक मोरे, प्रकाश विखारे आदींसह अन्य ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते. Health check up camp