• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर संपन्न

by Ganesh Dhanawade
June 17, 2023
in Guhagar
215 2
1
Health_camp_on_Thackeray's_birthday

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर

422
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागरचे तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी आयोजित

गुहागर, ता. 17 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने गुहागर ता. अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष, हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन महाआरोग्य शिबिर घेण्यात आले होते. Health camp on Thackeray’s birthday

Health_camp_on_Thackeray's_birthday
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर

गुहागर तालुक्यातील पालपेणे ग्रा.प.च्या सभागृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुका व अपरांत हॉस्पीटल, चिपळूण यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन पालपेणे ग्रा. प. च्या सरपंच योगिता पालकर, मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच रघुनाथ घाणेकर, संतोष पडवेकर, दिलीप पाष्टे, सुवर्णा महाडीक, पोलीस पाटील कमलाकर आदवडे, अपरान्त हॉस्पीटलचे डॉ. स्नेहल डांगरे, डॉ. प्रदीप आठवले, आ. सेविका गीता कराड, महेश मोघे महेश घाणेकर, प्रसाद कुष्टे, सुनिल मुकनाक, निलेश गमरे, सुयोग कुंबडे, प्रमोद जोशी, शैलेश महाडीक, राहुल जाधव, वैभव आदवडे, रश्मी घाणेकर, रामचंद्र पालकर, उमेश खैर, विनायक घाणेकर उपस्थित होते. Health camp on Thackeray’s birthday

या आरोग्य तपासणी शिबिराचा तालुक्यातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी ब्लडप्रेशर, पल्स, वजन उंची प्रमाण, ऑक्सीजन लेव्हल तपासणी, महिला चिकित्सा तपासणी अस्थिरोग तपासणी, हृदयविकार तपासणी अपरान्त हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडुन करण्यात आली. तसेच पित्ताचा त्रास, दम लागणे, वजन वाढणे, डायबेटिक, उच्च रक्तदाब, थायरॉईड, डोकेदुखी, गुडघेदुखी आदींची तपासणी करण्यात आली. Health camp on Thackeray’s birthday

यावेळी पालपेणे ग्रा.प.च्या वतीने सरपंच योगिता पालकर व उप सरपंच रघुनाथ घाणेकर व सर्व सदस्यांनी मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना प्रमोद गांधी यांनी मनसेच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम तसेच आरोग्य शिबिरे सतत घेतली जात आहेत. आजच्या आरोग्य शिबिरालाहि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यापुढील काळात देखील मनसेच्या वतीने आरोग्य विषयक जे सहकार्य हवे असेल ते मी देण्यास तयार आहे, असे ते म्हणाले. Health camp on Thackeray’s birthday

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHealth camp on Thackeray's birthdayLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtra Navnirman SenaMarathi NewsMNSNews in GuhagarUpdates of Guhagarअपरांत हॉस्पीटलगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामनसेमराठी बातम्यामहाराष्ट्र नवनिर्माण सेनाराज ठाकरेलोकल न्युज
Share169SendTweet106
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.