विवेकानंदालचा उपक्रम, डॉक्टरांच्या विशेष टीमचा समावेश
गुहागर. ता. 25 : इंटरनॅशनल लॉजेव्हीटी सेंटर इंडिया आयोजित व घरडा केमिकल्स लिमिटेड प्रायोजित, बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल, लवेल व साथ साथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांसाठी (वय वर्षे 55 व पुढे) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. Health camp for senior citizens
सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 4.30 या वाजेपर्यंत विवेकानंदालय ग्रामविकास प्रकल्प वेळणेश्वर, पिंपळ रोड, वाडदईच्या आधी, एम. एस. ई.बी. सबस्टेशन मागे घेण्यात येणार आहे. हे शिबिर सर्व रोग निदान शिबिर असून यात रक्त तपासणी, ईसीजी, रक्तदाब व रक्तशर्करा तसेच रोग निदान मोफत केले जाणार आहे. तसेच पुढील चाचण्या व उपचारांवर सवलतीही देण्यात येणार आहेत. Health camp for senior citizens

सदर शिबिरात भाग घेण्यासाठी जेष्ठ नागरिकांनी स्वतःचे आधार कार्ड झेरॉक्स व पासपोर्ट साईज फोटो घेऊन यावा. (नोंदणीसाठी व भविष्यातील सवलती मध्ये उपचारांसाठी अनिवार्य) अधिक माहितीसाठी सुशांत 9561327873, नंदकुमार 7276695540 यांच्याशी संपर्क साधावा. या शिबीरासाठी वेळणेश्वर पिंपळ फाटा ते आश्रम पर्यंत मोफत वाहन सेवा ठेवण्यात आली आहे. Health camp for senior citizens