आयुष्मान भव कार्यक्रमाअंतर्गत
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील प्रा.आ.केंद्र चिखली अंतर्गत उपकेंद्र वरवेली येथे आयुष्मान भव कार्यक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत वरवेली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. या आरोग्य शिबिरात उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कॅन्सर, स्तनांचा कॅन्सर, गर्भशयाचा कॅन्सर, तसेच रक्त तपासणी करण्यात आली. Health camp completed at Varveli


सदर “आयुष्मान भव” कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे सरपंच नारायण धाकु आगरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना मोफत औषधोपचार देण्यात आले. त्याच बरोबर असंसर्गजन्य रोगविषयी माहिती देण्यात आली.आयुष्मान भारत हेल्थ कार्ड, व आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यात आले व याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना योगा शिक्षिका श्रीमती अदिती गणेश धनावडे यांनी योगा व ध्यान साधना या विषयी मार्गदर्शन केले. Health camp completed at Varveli


सदर शिबिरासाठी उपसरपंच मृणाल प्रसाद विचारे, माजी सरपंच सुप्रिया देसाई, सदस्य संदीप पवार, नरेश रांजाणे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष वैभव पवार, ग्रामसेवक महेन्द्र भुवड, समुदाय आरोग्य अधिकारी योगेश गायकवाड, पत्रकार गणेश किर्वे,आशासेविका अनुष्का शिंदे, मदतनीस पौर्णिमा गमरे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Health camp completed at Varveli