तहसीलदार सौ. वराळे; लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीतर्फे आरोग्य शिबिर
गुहागर, ता. 09 : टेक्नॉलॉजीच्या युगात आपण पुढे जात आहोत. पण आपली संपत्ती असलेल्या आरोग्याकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. आरोग्य सुदृढ ठेवणे ही काळाची गरज असून हीच गरज ओळखून लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी यांनी विद्यार्थिनींसाठी आयोजित केलेले आरोग्य शिबिराचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरोद्गार तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी काढले. Health Camp by Lions Club

ज्यूनिअर कॉलेज गुहागर येथे लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी यांच्या पुढाकाराने अपरान्त हॉस्पिटल आणि ग्रामीण रूग्णालय गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थीनीसाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 81 विद्यार्थिनी व 12 शिक्षकांनी याचा लाभ घेतला. या शिबिरात हिमग्लोबीन, रक्तगट, थायरॉईड, कॅन्सर, शुगर, प्रेशर व शिक्षकांसाठी इसीजी इत्यादी तपासण्या घेण्यात आल्या. Health Camp by Lions Club
शरीर हे आपल्याला शेवटपर्यंत साथ देत असतो. त्यामुळे शरीराने ऑर्निंग बेल दिलेल्या आहेत हे लक्षात घेऊन वैद्यकीय उपचार केले पाहिजेत. विद्यार्थीनींनो तुम्हाला सक्षम महिला आणि सक्षम कुटुंब प्रमुख बनायचं आहे. त्यामुळे महाविद्यालयीन काळापासूनच आपल्या आरोग्याच्या बाबतीत सतर्क असणे गरजेचे आहे, असे आवाहन सौ. वराळे यांनी केले. गुहागर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. निलेश ढेरे यांनी आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. अनेक उपक्रम होत असतात पण महिला व मुलींच्या आरोग्याची काळजी घेऊन लायन्स क्लबने राबविलेला उपक्रम आदर्शवत असा आहे. विद्यार्थीनींनी आपल्या समस्या न लपवता घरातील इतर महिला सदस्यांशी बोलल्या पाहिजेत. मला काही होत नाही, झाले नाही, मी बरी आहे, हा गैरसमज दूर गेला पाहिजे, असे ते म्हणाले. Health Camp by Lions Club

यावेळी तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, अध्यक्ष ला. संतोष वरंडे, सेकेटरी ला. सचिन मुसळे, खजिनदार ला. मनिष खरे, प्रोजेट हेड ला. डॉ. अनिकेत गोळे, ला. डॉ. मयुरेश बेंडल, माजी अध्यक्ष ला. शामकांत खातू, ला. नितीन बेंडल. ला. माधव ओक, ला. निखिल तांबट, ला. विशाल गुहागरकर, ला. प्रसाद वैद्य, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निखिल जाधव, डॉ. निलेश ढेरे, मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, अधिपरीचरिका श्रीमती अंजना कांबळे, श्रीमती शुभांगी खेतले, श्रीमती आश्रया दहिवलकर, अपरात्न हॉस्पिटलच्या डॉ. एकता फोगाट, मानसी सकपाळ, राकेश कदम, माजी नगराध्यक्ष सौ. स्नेहा वरंडे, जीवनश्री प्रतिष्ठानचे सल्लागार गणेश धनावडे, राजीव कांबळे, शिक्षक श्री. कोरके, मनोज बोले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. मनाली बावधनकर यांनी केले. Health Camp by Lions Club
