अनुलोम आणि एकतावर्धक मंडळाकडून आयोजन
गुहागर, ता. 07 : पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 17 सप्टेंबर, 2024 ते दि.16 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष वैद्यकिय मदत कक्षाद्वारे राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबीरे आयोजीत करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत एकता वर्धक मंडळ असगोली वरचीवाडी या संस्थेने आरोग्य शिबीराचे आयोजन 1 ऑक्टोबरला केले होते. या शिबिरात 48 ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला. Health Camp at Asgoli Varchiwadi
असगोली वरचीवाडी येथील शिबिरामध्ये गुहागरचे माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल आणि गुहागर पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीमती दिप्ती असगोलकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. एकता वर्धक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शिबीरासाठी आलेल्या वैद्यकिय टीमचे स्वागत केले. त्यानंतर बोलताना राजेश बेंडल म्हणाले की, शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना जनतेपर्यंत पोचत आहेत. त्यासोबत ग्रामीण भागातील ग्रामस्थांची आरोग्य चाचणी देखील घेतली जात आहे. ही कौतुकाची गोष्ट आहे. ग्रामीण भागातील जनता विशेषत: शेतकरी कुटुंबे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अशा शिबीरांमधुन त्यांना डॉक्टरांकडे जावून तपासणी करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे दुर्लक्षीत आजार संबंधिताला समजेल, त्यावर उपचार घेता येतील. अनुलोम सारख्या सामाजिक संस्थेद्वारे हे पुण्याचे काम केले जात आहे. Health Camp at Asgoli Varchiwadi
असगोली येथील शिबिरामध्ये 48 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी शरिरात रक्त कमी असलेले, सायटीकामुळे पायदुखी असलेले, हृदयविकाराची शक्यता असलेले रुग्ण समोर आले. या रुग्णांचा शिबीरस्थानी मोफत ईसीजी काढण्यात आला. उपचारांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना औषधांबरोबर जीवनशैली व आहार विहाराविषयी डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. एका रुग्णांवर अधिक उपचार करण्याची गरज होती. या रुग्णाला संदर्भ सेवेचे कार्ड देवून अधिक उपचारासाठी परशुराम रुग्णालयात येण्याची विनंती डॉक्टरांनी केली. आलेल्या सर्व रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी संकलीत करण्यात आले. Health Camp at Asgoli Varchiwadi
रुग्ण तपासणीचे काम परशुराम रुग्णालय लोटेच्या वैद्यकिय टीमने केले. शिबीराची व्यवस्था सर्व एकता वर्धक मंडळ आणि महिला मंडळ असगोली वरचीवाडी यांनी केली होती. शिबीरादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी येवून एकता वर्धक मंडळाला शुभेच्छा दिल्या. Health Camp at Asgoli Varchiwadi