• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 July 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अपरांत हॉस्पिटलमध्ये पावसाळी आरोग्य शिबिर

by Mayuresh Patnakar
July 16, 2026
in Health
40 0
0
Health camp at Aparant Hospital
78
SHARES
223
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

केवळ ₹२५० मध्ये तज्ज्ञ तपासणी; विविध चाचण्यांवर विशेष सवलत

गुहागर, ता. 16 : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध आजारांचे वेळेत निदान व योग्य उपचार नागरिकांना उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने चिपळूण येथील अपरांत मल्टीस्पेशालिटी अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आयोजित विशेष पावसाळी आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ काल बुधवारी (दि. १५) हॉस्पिटलचे संचालक डॉ. अब्बास जबले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. हे शिबिर १५ ते २५ जुलै या कालावधीत सुरू राहणार आहे. Health camp at Aparant Hospital

या विशेष शिबिरामध्ये केवळ ₹२५० शुल्कात तज्ज्ञ फिजिशियन यांचे मार्गदर्शन, रक्तदाब तपासणी, ऑक्सिजन (SpO₂) तपासणी, वजन व बीएमआय (BMI) मोजणी तसेच ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे आदी पावसाळी आजारांबाबत वैद्यकीय सल्ला दिला जाणार आहे. शिबिरासाठी नोंदणी करणाऱ्या रुग्णांना ईसीजी (ECG) आणि रक्तशर्करा तपासणी मोफत करण्यात येणार आहे. Health camp at Aparant Hospital

याशिवाय शिबिरादरम्यान सोनोग्राफी, एक्स-रे, सीटी स्कॅन आणि विविध रक्त तपासण्यांवर २० टक्क्यांपर्यंत विशेष सवलत देण्यात येणार आहे. व्हायरल ताप, डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, लेप्टोस्पायरोसिस, पोटाचे विकार, सर्दी-खोकला, न्यूमोनिया, त्वचारोग तसेच सांधेदुखी व अस्थिरोगांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला व उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. Health camp at Aparant Hospital

अपरांत मल्टीस्पेशालिटी अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अनुभवी फिजिशियन, जनरल सर्जरी, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग व त्वचारोग विभागांसह अत्याधुनिक आयसीयू, आधुनिक निदान सुविधा आणि २४ तास आपत्कालीन सेवा उपलब्ध असून रुग्णाभिमुख सेवेमुळे परिसरातील नागरिकांचा विश्वास हॉस्पिटलने संपादन केला आहे. या विशेष पावसाळी आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अपरांत मल्टीस्पेशालिटी अँड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ७९९८८९८९८९, ७९९८७३७३७३, (०२३५५) २५४३४५ / २५४२५४ या नंबरवर संपर्क करावा. Health camp at Aparant Hospital

Tags: GuhagarGuhagar NewsHealth camp at Aparant HospitalLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share31SendTweet20
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.