गुहागर, ता. 25 : मुंबईतील युसूफ मेहेरअली सेंटरचे उपाध्यक्ष श्री. हरेश शाह यांचे शुक्रवार दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 2 वा. दुःखद निधन झाले. आज दुपारी 3 वाजता वरळी स्मशानभूमी – नेहरू सायन्स सेंटर जवळ, फोर सीझन्स हॉटेलच्या समोर यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी सोनल व मुलगा कबीर असा परिवार आहे. Haresh Shah is No More
श्री. हरेश शाह हे सेंटरचे सर्व कृती कार्यक्रमांमध्ये गेली ५० वर्षे सक्रिय होते. शिक्षण, आरोग्य, ग्रामोद्योग व पर्यावरण आदी सर्व क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. बदलत्या नवीन परिस्थिती प्रमाणे सेंटरच्या प्रत्येक विधायक उपक्रमांना त्यांनी आकार दिला आहे. ऊर्मीं भागात खादी ग्रामोद्योगच्या वतीने जे कारागीर उत्पादन बनवितात त्यांच्या बनविलेल्या वस्तुंना मुंबई सारख्या शहरात बाजारपेठ मिळवून देण्यात त्यांनी मोठे काम केले आहे. सेंटरच्या हॉस्पिटल अत्याधुनिक पद्धतीने डोळ्यांचे पशन होतील या साठी तज्ञ डॉक्टर व सामुग्री मिळविण्यात त्यांनी विशेष पुढाकार घेतला होता. Haresh Shah is No More
मु. तारा, ता. पनवेल येथील सेंटरच्या आसपास राहणाऱ्या आदिवासी मुलांना शिक्षणासाठी उत्तम सोया व्हावी व मुलींना शिक्षण घेण्यास सोयीचे व्हावे. म्हणून त्यांनी शाळेच्या प्रांगणात ५ वी ते १२ वी पर्यंत एका वसतिगृहाची निर्मिती करण्यासाठी खूप श्रम घेतले. आदिवासींसाठी निर्माण केलेल्या वस्तू भाजीपाला यासाठी प्रोत्साहन दिले. मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहता आले पाहिजे म्हणून त्यांनी फॅशन डिझाईनचा अभ्रासक्रम सुरु केला. अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण देण्यासाठी अनेक कोर्सेस सुरु केले. आय. आय. टी. व भाभा अणुशक्ती संशोधन केंद्र, ग्रामीण विज्ञान केंद्र, पांजरा पोळ, गोरक्षक, समितीसाठी त्यांनी लाखो रुपयांचे अनुदान प्राप्त केले. बजाज सारख्या संस्था पर्थ उद्योजक, मेरिको कंपनी, कोटक महिंद्रा सारख्याना विधायक कार्यक्रमांना साहाय्य करण्यास तयार केले. Haresh Shah is No More
श्री हरेश शाह हे सेंटर प्रमाणे युसूफ मेहेरअली विद्यालय, कोरा केंद्र, बोरिवली, वैकुंठभाई महेता रिसर्च सेंटर आदी अनेक संस्थचे ते पदाधिकारी होते. सर्व संस्थेच्या विविध उपक्रमांसाठी त्यांचे बारकाईने लक्ष होते. जेवढे करणे शक्य असेल तशी धडपड त्यांची सातत्याने राहत होती. विधायक काम करणाऱ्या अनेक संस्था संघटनांचे मार्गदर्शक होते. त्यामुळे आज अनेक कार्यकर्त्यांमध्ये पोरकेपणाची भावना आहे. युसुफ मेहेरअली सेंटरचे संस्थापक व स्वातंत्र्य सेनानी डॉ. जी. जी. पारीख हे त्यांचे सासरे आहेत. Haresh Shah is No More
सर्व संस्था / संघटनांच्या वतीने हरेश शाह यांना भावपूर्ण श्रद्धांजली !