श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900
मित्रांनो आपल्याला एक सवय लागलेली असते सतत टेन्शन घ्यायचं. ऑफिसला जाताना तुमची नेहमीची बस/ ट्रेन चुकली, तर किती टेन्शन घेतो आपण. आता कसं व्हायचं? मला लेट होणार. बॉस काय बोलेल का? मी ज्या कामाला निघालेलो/ली आहे, ते माझं काम लेट होणार, वगैरे. फक्त एका घटनेवर किती विचार करतो आपण. पण मला सांगा आता ती घटना घडून गेलेली आहे, मग विचार करून काय उपयोग होणार आहे का? उलट तुम्हीच तुमचा मूड खराब करून घेताय? पुढची गाडी पकडा आणि कामाला जा. Take it easy.
तुमची कामवाली आली नाही. काय विचार करता तुम्ही? तिला आजच बरं दांडी मारायची होती. आता मला एकटीलाच सर्व करावं लागणार. आज नेमकं मला बाहेर जायचं होतं, आणि हिने दांडी मारली. मला सांगा, जास्त टेन्शन घेऊन काय होणार आहे का? ती आली नाही हे सत्य आहे. मग टेन्शन कशाला. तुमचं काम तुम्ही आनंदाने करा Take it easy Didi
परीक्षेत तुमच्या मुलाला किंवा मुलीला कमी मार्क्स मिळाले. काय विचार करता? आम्हाला माहीत होतं हिला मार्क्स पडणार ते. बरं झालं तिला अद्दल घडली ते. आम्ही अभ्यास कर, अभ्यास कर असे सांगून कंटाळलो. आता आम्हाला काय करायचंय? तिचं नशिब आणि ती. इथून पुढे पण काय दिवे लावणार आहे काय माहित. असे अनेक नको ते विचार आपण करत असतो. रिझल्ट लागलाय, मार्क कमी मिळालेत. ही घटना होऊन गेली, हे सत्य आहे.. मग आता त्याच्यावर एवढा विचार करून काय करायचं. पुढील ऍडमिशन कुठे घ्यायचं त्याच्यावर फोकस करा. मित्रांनो अजिबात टेन्शन घेऊ नका. टेक इट इझी यार
तुमची रजा, तुमच्या साहेबांनी नाकारली. मग काय विचार करता? अरे हा माझा बॉस आहे ना, तो एकदम खडूस आहे. त्याला काय कुणाची पडलेली नाही. पण मला गावी जायचंच आहे, मी काहीही करून जाणारच आहे. तो नाही म्हणाला तरी मी जाणारच आहे. अरे मग कशाला टेन्शन घेतोयस. तुला गावी जाणं महत्त्वाचं आहे, मग तुला जावं लागणारच आहे. तर मग आनंदाने जा. जास्त टेन्शन घेऊ नकोस. Take it easy my friend
कधी तुम्ही आजारी पडला की काय मनात विचार येतात? हे माझ्या मागेच का? आता मला औषधांचा खर्च करावा लागेल. एवढा पैसा कुठून आणायचा? आमचं सगळं चांगलं चाललं होतं, पण कुणाला बघवलं नाही वाटतं. वगैरे… अरे, आता तू आजारी पडलायस तर डॉक्टरांचा सल्ला घे, डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घे. स्वतःची काळजी घे.आतापर्यंत स्वतःची काळजी घेतली नाहीस, इथून पुढे घ्यायला चालू कर. टेन्शन नको घेऊस.. Take it easy yaar
मित्रांनो आपल्या जीवनात असे अनेक छोटे-मोठे प्रसंग येतात. त्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी झाली नाही म्हणून टेन्शन घेऊ नका. दुसऱ्या कुणालाच दोष देऊ नका. व स्वतःलाही कमी लेखू नका. आनंदाने आलेली परिस्थिती स्वीकारा आणि पुढे चला. Take it Easy my friends
Lots of Love and Blessings for you
राजेंद्र कुलकर्णी यांच्या “यशस्वी भव:” संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
आनंदी जगण्याचा मार्ग मागिल भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
(भाग -8 आपण उद्या जाणून घेणार आहोत.)
धन्यवाद
तुमच्या पुढील उज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप प्रेम व शुभेच्छा