• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आनंदी जगण्याचा मार्ग भाग -5

by Manoj Bavdhankar
October 19, 2022
in Health
22 0
1
Happy Life part – 11
43
SHARES
122
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

स्वतःला बदला, जग आपोआपच बदलेल

श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900
मित्रांनो ज्या ज्या वेळी एखादी चांगली पोस्ट आपण वाचतो, एखादा चांगला व्हिडिओ बघतो, एखाद्या व्यक्तीचे ट्रेनिंग घेत असतो त्यावेळी पहिल्यांदा आपल्या मनात येतं की हे ट्रेनिंग माझ्या नवऱ्या करता किंवा बायको करता, सासू सासऱ्यांकरता खूप उपयोगी आहे. ही गोष्ट माझ्या नंदेच्या मुलाकरता,  मैत्रिणीच्या मुलीकरता किंवा मित्रा करता खूप गरजेची आहे.

आपण लगेच ती पोस्ट, तो व्हिडिओ त्यांना पाठवत असतो. एखादा चांगला ट्रेनिंग प्रोग्रॅम आला तर आपल्याला सोडून इतरांना तो कसे चांगला आहे हे आपल्या मनात येतं आणि त्यांना ती ट्रेनिंग ची माहिती, जाहिरात किंवा तो व्हिडिओ आपण फॉरवर्ड करत असतो. मित्रांनो असं करणं चांगलंच आहे. इतरांच्या बद्दल तुमच्या मनात असलेली चांगली भावना यातून दिसून येत आहे. Happy Life part – 5

परंतु एक लक्षात घ्या. तुम्ही या ग्रुप मध्ये स्वतः जॉईन झालेला आहात, कारण तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची आहे. तुम्हाला चांगलं आरोग्य, यश, कीर्ती मिळवायची आहे आणि म्हणून प्रथम तुम्हाला स्वतःला ही गोष्ट, हे ट्रेनिंग खूप गरजेचं आहे. स्वतः प्रत्येक पोस्ट काळजीपूर्वक वाचा, त्या पोस्ट मधून दिला गेलेला संदेश स्वतः फॉलो करत चला. तुमच्यामध्ये चांगला सकारात्मक बदल घडू द्या. तुमच्यातला प्रत्येक बदल तुमच्या घरातील तुमचा नवरा, बायको, मुलं, इतर नातेवाईक, तुमचे मित्र बघतायंत.

तुमच्यात झालेला चांगला बदल त्यांनाही सुखावतोय,  त्यांनाही हवाहवासा वाटतोय. मित्रांनो तुमच्या शारीरिक, मानसिक, व्यवसायिक व आध्यात्मिक क्षेत्रात झालेली प्रगती त्यांच्या करता सरप्राईज आहे. त्यांच्या जीवनात देखील असा चमत्कार व्हावा असं त्यांना देखील वाटेल. अशावेळी ही लोकच तुम्हाला स्वतःहून विचारतील की तू नक्की काय करतेस? कोणाचं मार्गदर्शन घेतेस? तुला असा कोणता उपाय मिळाला की ज्यामुळे तुझं सर्व जीवनच बदलून गेलंय? Happy Life part – 5

आणि मित्रांनो ज्यावेळी समोरून अशी विचारणा होईल, त्यावेळी तुम्ही पाठवलेली प्रत्येक पोस्ट, जाहिरात ते नक्की वाचतील. तुम्ही पाठवलेला व्हिडिओ ते नक्की बघतील. तुम्ही शिफारस केलेले ट्रेनिंग ते नक्की घेतील. आतापर्यंत तुम्ही पाठवलेल्या सर्व चांगल्या पोस्ट, चांगले व्हिडिओज हे वाचत किंवा पहात देखील नव्हते, म्हणजेच ते तुम्हाला किंमत देत नव्हते. अगोदर तुमची व्हॅल्यू वाढवा आणि मग तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला हे सर्वजण किंमत देतील, तुमचा आदर करतील.

प्रत्येक पोस्ट, प्रत्येक मोटिवेशन पहिल्यांदा तुमच्या स्वतः करता आहे हे मनाला सांगा व त्याच्यावर ॲक्शन घ्या. हळूहळू तुमच्या सर्व क्षेत्रात तुम्हाला चांगला बदल जाणवेल, तुमची प्रगती होत जाईल. तुम्ही स्वतःला बदला, जग आपोआपच बदली होईल. Happy Life part – 5

राजेंद्र कुलकर्णी यांच्या “यशस्वी भव:” संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी  क्लिक करा.

आनंदी जगण्याचा मार्ग मागिल भाग वाचण्यासाठी क्लिक करा.

(भाग -6 आपण उद्या जाणून घेणार आहोत.)

धन्यवाद
तुमच्या पुढील उज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप प्रेम व शुभेच्छा

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHappy Life part – 5Latest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share17SendTweet11
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.