श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900
काल बऱ्याच मित्रांनी मेसेज करून व काहींनी फोन करून मला विचारले की स्वतःवर प्रेम करण्यासाठी वेळ कसा काढायचा? आणि Self Love नक्की कसे करायचे?
मित्रांनो कल्पना करा तुमचा आवडता मित्र किंवा एकदम खास मैत्रीण, त्यांना भेटण्यासाठी तुम्ही काय काय बहाने काढता? तुमचं शेड्युल कितीही बिझी असलं तरीही तुम्ही थोडासा वेळ तुमच्या आवडत्या व्यक्तीशी बोलण्यासाठी अथवा त्याला भेटण्यासाठी काढताच ना? मग असं समजा की तुमचा प्रिय मित्र किंवा प्रिय मैत्रीण तुम्हाला भेटण्यासाठी बोलावत आहे. मग तुमच्या रोजच्या बिझी शेड्युलमधून तुम्ही त्याकरता वेळ काढू शकाल.
सकाळी उठल्यावर स्वतःचाच हात हातात घ्या.. आणि त्याला थँक्यू बोला.
ब्रश करायच्या अगोदर किंवा नंतर आरशासमोर जा व समोरील व्यक्तीला म्हणजेच तुमच्या प्रिय मित्राला किंवा मैत्रिणीला एक मस्त स्माईल द्या.
तुमची आंघोळ झाल्यावर स्वतःच आवरताना आरशात बघताच ना?
आज पासून हे बघणं, तुमच्या आत्तापर्यंतच्या बघण्यापेक्षा काहीतरी वेगळं असेल. कारण तुमच्यासमोर तुमची प्रिय व्यक्ती असेल. मग थोडसं आनंदाने, उत्साहाने, थोडं लाजत तुम्ही स्वतःचा नट्टाफट्टा कराल. स्वतःलाच ‘आय लव यू’ म्हणा.. बघा किती छान वाटतं ते.
सकाळी कमीत कमी 20 ते 40 मिनिटे स्वतःसाठी काढा.
थोडा प्राणायाम करा.
थोडं मेडिटेशन करा.
थोडा योगा /व्यायाम करा.
स्वतःबद्दल चांगली वाक्ये (positive affirmations) बोला.
हा! तुमचा प्रिय मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला दररोज भेटणार म्हटल्यावर स्वतःला चांगलं सजवणं आलंच.
जे कपडे तुम्हाला शोभतात, ज्या कपड्यांमध्ये तुम्हाला आनंद वाटतो, उत्साह वाढतो असे कपडे घालायला सुरुवात करा. तसे कपडे नसले तर लवकरच ते शिवून घ्या किंवा विकत आणा.
नेहमी चांगली चप्पल किंवा शूज घालत चला. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढत असतो.
आतापर्यंत ‘मला कोण बघणार आहे? माझी या जगात काही किंमतच नाही. मी काही कामाची व्यक्ती नाही’ असे मनामध्ये नकारात्मक विचार करून तुम्ही गबाळे कपडे घालत होता, कुठेही जाताना स्लीपर वर जात होता, नट्टाफट्टा न करता जात होता ते आता बंद करा.
दुपारी अथवा संध्याकाळी थोडा वेळ काढा. तुम्हाला आवडणारी कृती करा. उदाहरणार्थ चांगलं म्युझिक ऐका, स्वतः गाणी म्हणा, घरामध्ये भक्ती मार्गातील काही तुम्ही करत असाल तर तसं वाचन करा, भजन करा, तुमची डायरी लिहा. आज पासून तुमचं आयुष्य पूर्णपणे बदली झालेलं असेल.
संपूर्ण दिवस सतत तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल ठेवा.
रात्री झोपताना देखील आरशासमोर जाऊन स्वतःला एक स्माईल द्या. तिच्यामुळे आजचा तुमचा दिवस दिवस कसा छान गेला, ते त्या प्रिय व्यक्तीला सांगा.
रात्री आनंदाने झोपी जा.
एवढा चांगला मित्र, एवढी सुंदर मैत्रीण तुम्हाला दिल्याबद्दल व तिची पुन्हा भेट घडवून आणल्याबद्दल परमेश्वराचे मनापासून आभार माना.
मला खात्री आहे मी दिलेल्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो कराल व तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेलं असेल.
राजेंद्र कुलकर्णी यांच्या “यशस्वी भव:” संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
आनंदी जगण्याचा मार्ग मागिल भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
(भाग -4 आपण उद्या जाणून घेणार आहोत.)
धन्यवाद
तुमच्या पुढील उज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप प्रेम व शुभेच्छा