• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आनंदी जगण्याचा मार्ग भाग -18

by Manoj Bavdhankar
November 4, 2022
in Health
18 0
1
Happy Life part – 18
35
SHARES
101
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तुमच्या फॅमिली साठी वेळ द्या

श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900/ 9930653355
मित्रांनो आपण प्रत्येक जण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी नुसते पळत असतो. रोज सकाळी कामावर जायचे, ते रात्री यायचे. कामामध्ये, प्रवासामध्ये तुमचा पूर्ण दिवस धावपळीत जात असतो. तुम्हाला कामावर जाताना डबा देण्यासाठी तुमच्या पत्नीला, तुमच्या आईला किंवा बहिणीला तुमच्यासाठी लवकर उठावे लागते.

तुमचं झाल्यानंतर मुलांचं आवरायचं, त्यांना शाळेत सोडायचं, त्यांना टिफिन द्यायचा.पुन्हा संध्याकाळची कामे सुरु होतात. घरातील सर्व मंडळी जेवण झाली की निवांत टीव्ही बघत बसतात, परंतु तुमची आई, तुमची पत्नी किंवा बहीण घरातील सर्व आवरून, भांडी घासून सर्वात शेवटी झोपायला जातात. त्या माऊलीला पण वाटत असते की तिच्या मुलाने, तिच्या नवऱ्याने किंवा तिच्या भावाने दिवसभरातून एकदा तरी तिच्या जवळ बसावे, तिची विचारपूस करावी. परंतु धावपळीच्या या जीवनामध्ये आपल्याला ते करायला वेळच नसतो.

तुमच्या आई-वडिलांना देखील वाटत असते की दिवसभर टीव्ही बघून कंटाळा आलेला आहे, आता मुलाशी थोड्या गप्पा माराव्यात. परंतु त्यांच्या जवळ बसून त्यांची विचारपूस करण्यासाठी, त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी तुमच्याकडे वेळच नसतो. मित्रांनो तुमच्या म्हाताऱ्या आई-वडिलांना लागणारी औषधे देऊन तुम्ही त्यांची काळजी घेत आहात, असे तुम्हाला वाटत असते. परंतु, तसे नाही मित्रांनो, त्यांच्याजवळ बसून थोड्या गप्पा माराव्यात, त्यांची विचारपूस करावी ही त्यांची अपेक्षा असते.

तुमची मुले तुमची नेहमीच वाट बघत असतात. पप्पा येतील आणि मला गोष्ट सांगतील. पप्पा येतील मला फिरायला घेऊन जातील. पप्पा येतील आणि मला विचारतील “तुला काय झाले आहे? तु का असा निराश होऊन बसला आहेस?” परंतु मित्रांनो त्यांचा देखील भ्रमनिरास होत असतो.

मित्रांनो, तुम्ही तुमच्या ऑफिसचे काम पूर्ण करण्यात, तुमच्या बिझनेस मधील टार्गेट पूर्ण करण्यात, तुमच्या क्लायंट बरोबर चांगले  संबंध ठेवण्यासाठी त्याच्यासोबत पार्टी करण्यामध्ये मग्न असता.

मित्रांनो, तुम्ही एवढे सर्व करता, कशासाठी? तर पैसा मिळवण्यासाठी, सुखी होण्यासाठी, आनंदी होण्यासाठी!

परंतु खरं सुख कशात आहे? पैशाने तुम्हाला सर्व काही गोष्टी विकत घेता येतील, परंतु तुम्हाला खरा आनंद मिळणार नाही, समाधान मिळणार नाही. दिवसातून थोडा वेळ काढा, तुमच्या जोडीदारासोबत गप्पा मारा. तिचा हात हातात घ्या, प्रेमाने दोन शब्द बोला. तुमच्या आई-वडिलांपाशी बसा, त्यांची आस्थेने चौकशी करा. तुमच्या मुलांसोबत खेळा, त्यांना गोष्टी सांगा, त्यांच्याकडून शुभंकरोती म्हणून घ्या. बघा त्या सर्वांना किती आनंद होतो ते ! 

मित्रांनो तुमच्या प्रत्येक यशामध्ये तुमच्या आई-वडिलांचा, तुमच्या फॅमिलीचा खूप मोठा वाटा असतो,  त्यामुळे त्यांना वेळ द्या. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील व तुमच्या यशाचा आलेख अजून उंच जाईल.

राजेंद्र कुलकर्णी यांच्या “यशस्वी भव:” संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी  क्लिक करा.

आनंदी जगण्याचा मार्ग मागिल भाग वाचण्यासाठी क्लिक करा.

(भाग -19 आपण उद्या जाणून घेणार आहोत.)

धन्यवाद,
तुम्हाला खूप खूप प्रेम व शुभेच्छा

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.