सराव करा
श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900
मित्रांनो, आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला आवडते. आपण त्या शिकतो देखील, परंतु आपण त्या आचरणात आणत नाही. त्यामुळे आपल्याला अपेक्षित परिणाम दिसत नाही.
तुम्ही तुमच्या मुलांना बऱ्याच गोष्टी शिकवत असता. कोणी आपल्या मुलाला तबला वाजवायला शिकवते, तर कोणी हार्मोनियम शिकायला पाठवतात. कोणाला गाणी शिकायला आवडते. कुणी योगाचा क्लास जॉईन करतात. आपण आपल्यासाठी व आपल्या मुलांसाठी नव नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत असतो.
परंतु मला सांगा, जर तुमच्या मुलांनी तुम्हाला पाहिजे तो क्लास केला आणि नंतर प्रॅक्टिस नाही केली, तर चालेल का? गाण्याचा रियाज दररोज व्हायला हवा. तबला, पेटी दररोज बाहेर काढायला हवी आणि त्याचा सराव करायला हवा. जर त्याचा आपण सराव नाही केला तर शिकवलेला अभ्यास लक्षात राहत नाही. त्यामुळे एवढे शिक्षण घेऊन सर्व व्यर्थ होते.
शाळेमध्ये मुलांनी गणित विषय शिकला, परंतु घरी आल्यावर त्याचा सराव केला नाही तर काय उपयोग? परीक्षेमध्ये त्याला काही लिहिता येणार नाही. त्याला अपेक्षित यश मिळणार नाही.
हीच गोष्ट तुमच्यासाठी देखील लागू होते. आत्तापर्यंत आपण गेले पंधरा दिवस अभ्यास करत आलो आहोत. आता गरज आहे त्याच्या सरावाची, रियाज ची! जर तुम्ही आतापर्यंत शिकलेल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष केंद्रित केले आणि त्या गोष्टी तुमच्या जीवनात अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तरच या शिक्षणाचा काहीतरी उपयोग होईल. तुम्हाला तुमचे जीवन अधिक सुंदर बनायला हवे असे वाटते ना? तर मग इथून पुढे चार दिवस तुम्हाला फक्त सराव करायचा आहे.
Practice makes man perfect
तुमची स्वतःची एक स्वतंत्र वही किंवा डायरी बनवा. पहिले पान तसेच सोडून द्या. दुसऱ्या पानावर तुमचा फोटो लावा, वर तुमचे नाव लिहा, बाजूला तारीख लिहा. फोटोच्या खाली धन्यवाद किंवा Thank you असे लिहा. तिसऱ्या पानावर तुमच्या इच्छा लिहा. चौथ्या पानापासून आपण दिलेला सराव करायला चालू करा. आपण शिकलेल्या पंधरा दिवसांमध्ये महत्त्वाचे मुद्दे लिहून काढा. त्याच्यावर तुम्ही काय ॲक्शन घेतली ते देखील नमूद करा. तुम्ही सराव चालू केला की तुम्हाला काही प्रश्न पडतील. अमुक एका समस्येतून बाहेर कसे पडायचे? एखाद्या गोष्टीवर विचार कसा करायचा? मित्रांनो तुमचे सर्व प्रश्न लिहून ठेवा. शक्य असेल तर ग्रुपमध्ये शेअर करा, नसेल तर मला वैयक्तिक शेअर करा चार दिवसानंतर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
चार दिवसानंतर पुन्हा आपण भेटूया, अजून जबरदस्त मोटिवेशन घेऊया.
राजेंद्र कुलकर्णी यांच्या “यशस्वी भव:” संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
आनंदी जगण्याचा मार्ग मागिल भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
(भाग -17 आपण उद्या जाणून घेणार आहोत.)
धन्यवाद,
तुम्हाला खूप खूप प्रेम व शुभेच्छा