उमदेवाडी ग्रामस्थ मंडळ व उत्कर्ष महिला मंडळ यांचा स्तुत्य उपक्रम
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 09 : तालुक्यातील कोतळूक उदमेवाडीतील श्री हनुमंताचे मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त धार्मिक विधी व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व कार्यक्रमांना कोतळूक गावातील आणि पंचक्रोशीतील भक्तगणांनी, भाविकांनी नागरीकांनी आणि तमाम जनतेने बहूसंख्येने उपस्थित रहावे, असे जाहीर आवाहन उदमेवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष समीर मुकुंद ओक, महिला अध्यक्ष मेघा महेश महाडीक व सदस्यांनी केले आहे. Hanuman Jayanti at Kotluk Umdevadi


दिनांक 12 रोजी सकाळी अभिषेक, श्री सत्यनारायणाची महापूजा, स्थानिक भजन, दुपारी ३ ते ५ महिलांचे हळदीकुंकू, रात्री ८.३० वा. अंजनीमाता महिला मंडळ कोतळूक उदमेवाडी यांचे भजन, रात्री १०.३० वा. दशरथ राणे लिखित, दिनेश बागकर दिग्दर्शित श्री. हनुमान नाटयमंडळ कोतळूक उदमेवाडी मधील स्थानिक कलाकाराचे दोन अंकी विनोदी नाटक “यंदा कर्तव्य आहे” हा नाट्यप्रयोग सादर करणार आहेत. Hanuman Jayanti at Kotluk Umdevadi
शनिवार दि 12 रोजी सकाळी ५.३० वा. स्थानिक भजन, सकाळी ६.२५ वा. श्रींचा जन्मसोहळा, दुपारी १.३० वा. ह. भ.प.श्री पद्माकर नारायण जोशी वरवडे रत्नागिरी यांचे किर्तन, सायंकाळी ५ वा. खास आकर्षण सहीत श्रींची पालखीतून सवाद्य मिरवणूक, रात्री ९.४५ वा. गुणवंत सत्कार, रात्री १०.३० वा. केदारलिंग नाटय नमन मंडळ काटवली संगमेश्वर यांचे बहुरंगी नमन गण, गौळण, वगनाट्य सादर केले जाणार आहे. Hanuman Jayanti at Kotluk Umdevadi