श्री देव हनुमान देवस्थान फंड बाजारपेठ यांच्या वतीने आयोजन
श्री देव हनुमान देवस्थान फंड बाजारपेठ गुहागर यांच्या वतीने शनिवार दिनांक 12 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव श्रीदेव व्याडेश्वर येथे साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Hanuman Janmatsav at Sri Dev Vyadeshwar


यामध्ये सकाळी ६ ते ८ वाजता कीर्तनकार मनाली मनोज बावधनकर यांचे जन्मोत्सवाचे कीर्तन, सकाळी ९ ते १० वाजता श्रींची पूजा, अभिषेक, लघु रुद्र दुपारी ११ ते १२ वाजता स्वरसाधना महिला भजन मंडळ गुहागर यांचे सुश्राव्य भजन, दुपारी १२ वाजता महाआरती, दुपारी ४ ते ५ वाजता सिद्धकला भजन मंडळ गुहागर यांचे सुश्राव्य भजन, सायंकाळी ६ ते ८ वाजता लळीतांचे कीर्तन आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री हनुमान देवस्थान फंड गुहागर यांनी केले आहे. Hanuman Janmatsav at Sri Dev Vyadeshwar