संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 26 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, शर्मिला राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने जानवळे येथे श्री साई मंदिरात “हळदी कुंकू समारंभ” उत्साहात साजरा करण्यात आला. Haldi Kunku ceremony by MNS
“साजरे करू हळदी कुंकू करून संकटावर मात” ,”हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळाची करू खैरात” तिळगुळ घ्या गोड गोड बोला..! अशाप्रकारे हळदी कुंकू समारंभ उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, महिला तालुका अध्यक्ष सानिया ठाकूर महीला कार्यकर्त्या निशा राजेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली व गावातील महिला आणि विशेष ग्रामपंचायत सदस्य वैभवी विनोद जानवळकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. Haldi Kunku ceremony by MNS
यावेळी जानवळे ग्रामपंचायत संरपच जान्हवी विखारे, ग्रामपंचायत सदस्या सेजल धामणस्कर, माजी ग्रामपंचायत सदस्य सायली शिरगावकर, सुष्मिता मादलेकर, सोजल धातकर, श्रावणी चिपळूणकर, अमुता जानवळकर, सुखदा पोतदार, वैष्णवी जानवळकर यांनी उपस्थित सर्व महीलांचे स्वागत केले. Haldi Kunku ceremony by MNS